शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – आ.सत्यजित तांबे
![]()
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध –
आ.सत्यजित तांबे
राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी पोहचवुन त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन असे प्रतिपादन नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
नाशिक विभागाचे पदवीधर आमदार मा.सत्यजित तांबे यांनी नुकतीच शिरपूर येथील किसान विद्या.प्रसारक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली.यावेळेस किसान विद्या.प्रसारक संस्थेचे सचिव,सिनेट सदस्य तथा महाराष्ट्र राज्य टीडीएफचे कोषाध्यक्ष,निशांत रंधे यांनी स्वागत करुन
शिक्षकांच्या विविध प्रश्न, समस्या,अडचणी मा.आमदार सत्यजीत तांबे यांच्यासमोर स्पष्टपणे मांडल्या.
शिक्षक भरती,जुनी पेन्शन योजना,शिक्षकांसाठी टी.ई.टी परीक्षा,यासंदर्भात चर्चा केली,बऱ्याच ठिकाणी शालार्थ प्रणालीत येणाऱ्या अडचणी मांडल्या तसेच शालार्थ आयडी मिळालेल्या शिक्षकांचा पगाराचा ड्राफ्ट निकाली काढणे,अशा शिक्षकांच्या समस्या शासन स्तरावर मांडुन संस्था व शिक्षक कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी अशी मागणी केली.नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या भेटीसाठी संस्था व शिक्षक प्रतिनीधी म्हणून निशांत रंधे,अ.भा.प्रा.शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवंतराव बोरसे, पदवीधर महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष शरदराव सूर्यवंशी,टी.डी.एफ. तालुकाध्यक्ष चेतन पाटील,प्राथमिक संघटनेचे संतोष जाधव,छोटुसिंग राजपूत,दत्तात्रय पाटील,संदीप पवार,महेश ठाकूर,किरण पाटील तसेच महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे पदाधिकारी प्रशांत पाटील,चंद्रकांत सोनार, जगतसिंग राजपूत,शिक्षकेतर प्रतिनिधी प्रमोद बोरसे तसेच संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव पाटील,के.डी.बच्छाव,भैय्या माळी,सिताराम माळी उपस्थित होते.आपल्या सर्व समस्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन आमदार महोदय यांनी दिले.

