श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर *समाजकार्य महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
![]()
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर
*समाजकार्य महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न*
अमळनेर प्रतिनिधी
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय व औद्योगिक संस्था येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले.
स्नेह संमेलन उद्घाटन समारंभ अध्यक्ष सुभाष भांडारकर यांनी भूषविले.
प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य डॉ धीरज वैष्णव, आय आय टी मुंबई येथील डॉ राहुल देशमुख, दिनेश नाईक, राष्ट्र विकास संस्था सचिव तुषार पाटील, आधार संस्था प्रतिनिधी अश्विनी सूर्यवंशी, आनंद पगारे, मुरलीधर बिरारी, मोहिनी धनगर, दिप्ती गायकवाड , द्यानेश्वरी पाटील,आप्पासाहेब सूर्यवंशी, पालक, संस्था प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर, संचालक विवेकानंद भांडारकर, डॉ महेश पाटील, अमोल राजपूत, ओम भांडारकर, प्राचार्य डॉ पी एस पाटील, विनोद वैद्य, विभाग प्रमुख डॉ जगदीश सोनवणे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा धनराज ढगे, डॉ अस्मिता सर्वैया यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला.
या प्रसंगी एम एस डब्ल्यू अभ्यासक्रम संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थीनी मोहिनी धनगर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला.
विविध स्पर्धा, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, राष्ट्रीय परिषदा,सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी यांना समारोप प्रसंगी बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले.
आभार प्रदर्शन डॉ अस्मिता सर्वैया यांनी व्यक्त केले.
सूत्र संचलन तेजस्विनी पाटील, डॉ भरत खंडागळे, डॉ श्वेता वैद्य, जानवी पाटील यांनी केले.
पालक, संस्था प्रतिनिधी, माजी विद्यार्थी परिसंवाद संपन्न झाला.
प्राचार्य डॉ पी एस पाटील, विभाग प्रमुख डॉ जगदीश सोनवणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.परिसंवाद सूत्र संचलन किर्ती सोनवणे, रत्ना खैरनार यांनी केले.
यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

