राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करा. माळी व ओबीसी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन !…..
![]()
राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करा.
माळी व ओबीसी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन !…..
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव : तेलंगणा राज्यात तेल्लापूर येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी. अशी मागणी धरणगाव येथील माळी व समस्त ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली. याबाबत धरणगाव तहसिलदार यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. तेलंगणातील तेल्लापूर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाचा अवमान करणारी घटना घडली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी व सदरील समाजकंटकांनी केलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ धरणगावात सकल ओबीसी समाजाच्यावतीने निषेध निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, देशात राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची, विचारांची अशा प्रकारे अवमान करणे अत्यंत चुकीचे असून अशा देश विरोधी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी या घटनेतील दोषी समाजकंटकावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शिक्षा करण्यात यावी. यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्यासह समाजाचे जेष्ठ पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.समाजाचे अध्यक्ष व्ही.टी.माळी, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष सोमनाथ महाजन, शिवाजी देशमुख, सचिव आर डी महाजन, राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्षा सुरेखा महाजन, विठोबा महाजन, गुलाबराव वाघ, संजय महाजन, कैलास माळी, विजय महाजन, कैलास वाघ, गणेश महाजन, पत्रकार रविंद्र महाजन, आबासाहेब वाघ, विनायक महाजन,दिपक महाजन, भटुलाल महाजन, तुळशिराम माळी, नितेश महाजन, शांताराम महाजन, आबासाहेब राजेंद्र वाघ, एच डी माळी, पी डी पाटील, नरेद्र पाटील, अमोल महाजन, टोनी महाजन, तेजस महाजन, यशोदिप माळी, प्रल्हाद माळी, पत्रकार रविंद्र महाजन, ह भ प प्रशांत वाघ इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

