महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन*  *सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा आढावा*
1 min read

महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन* *सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा आढावा*

Loading

*महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन*

*सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा आढावा*

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक ठिकाणांचे महाराष्ट्रव्यापी सेफ्टी ऑडिट महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेमार्फत करण्यात आले असून, या उपक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन लाभले. महिलांचा संचाराचा हक्क हा केवळ प्रवासापुरता मर्यादित नसून तो सन्मानाने जगण्याच्या आणि विकासाच्या अधिकाराशी जोडलेला आहे, या दृष्टिकोनातून हे ऑडिट राबविण्यात आले.

या ऑडिटमध्ये बसस्थानके, रेल्वे स्थानके व सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात आली. सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था, महिला व पुरुष पोलिसांची गस्त, हेल्पलाईन, पॅनिक बटण, स्वच्छतागृहे, महिलांसाठी राखीव आसने, विशेष बसेस व रेल्वे डबे, तसेच ‘हिरकणी कक्ष’ यांसारख्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती तपासण्यात आली.

अनेक ठिकाणी उपाययोजना अस्तित्वात असूनही अंमलबजावणीत त्रुटी आढळल्याचे निदर्शनास आले. विशेषतः पॅनिक बटण प्रणाली प्रभावीपणे कार्यरत नसल्याचे लक्षात आले. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी ही यंत्रणा नियंत्रण कक्षाशी थेट जोडली जावी, याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यापूर्वीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद आणि विविध महिला संघटनांनी सेफ्टी ऑडिटचा अहवाल सादर केला. प्रत्येक बस स्थानकावर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करून मदत केंद्र सुरू करणे, रेल्वे व एसटीसाठी स्वतंत्र दक्षता समित्या स्थापन करणे, स्वच्छतागृह व ‘हिरकणी कक्षांची’ नियमित तपासणी करणे, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत समन्वय साधून बैठका घेण्यात येतील. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी दोन्ही विधिमंडळातील सदस्याांचे सहकार्य व सहभाग घेऊन पुढील अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद आणि इतर महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या पाहणीचा सविस्तर अहवालासोबत विविध २० पुस्तिकाही नीलम गोर्हे यांना सादर केल्या. शारदा साठे (अध्यक्ष, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद), स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, सुप्रसिद्ध लेखिका व संशोधक छाया दातार, कामगार नेत्या लता भिसे सोनवणे (भारतीय महिला फेडरेशन), प्रा. उज्वला मसदेकर (पुणे सेफ्टी ऑडिट समिती सदस्य), संकल्पना कऱ्हाडे, संगीता जोशी, स्नेहल वेळकर, रेश्मा ठोसर, अमोल केरकर आणि संगीता सराफ यांनी ऑडिटमधील निष्कर्ष मांडले. उपसभापती कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी मेघना सावंत भोसले उपस्थित होत्या त्यांनी मिनिट्स घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *