धास्तीच्या वातावरणात आत्मविश्वासाचा विजय!  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ज्ञानेश्वर पाटील सरांचे टिईटीत सहावे यश
1 min read

धास्तीच्या वातावरणात आत्मविश्वासाचा विजय! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ज्ञानेश्वर पाटील सरांचे टिईटीत सहावे यश

Loading

धास्तीच्या वातावरणात आत्मविश्वासाचा विजय!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ज्ञानेश्वर पाटील सरांचे टिईटीत सहावे यश

अमळनेर प्रतिनिधी :
गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता. पारोळा जि. जळगाव येथील कर्तव्यदक्ष व अभ्यासू शिक्षक ज्ञानेश्वर प्रकाश पाटील सर यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) तब्बल सहाव्यांदा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशातील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांवर कार्यरत शिक्षकांना मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार दि. ३० ऑगस्ट २०२७ पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे अनेक शिक्षकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असताना ज्ञानेश्वर पाटील सर यांनी सातत्यपूर्ण परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा टिईटी उत्तीर्ण होऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
पाटील सर यांनी २०१३, २०१४, २०१५, २०१७, २०१८ आणि २०२५ या वर्षांत परीक्षा देत प्रत्येक वेळी यश संपादन केले. महाराष्ट्रात ही परीक्षा आतापर्यंत केवळ आठ वेळा घेण्यात आली असून त्यापैकी सहा वेळा परीक्षा देऊन प्रत्येक वेळी यश मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल छत्रपती कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दादासाहेब कृषीभूषण साहेबराव पाटील, अमळनेर नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसाहेब जिजामाता कृषीभूषण पुष्पलता साहेबराव पाटील, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील तसेच विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि राजवड, खेडीढोक व दगडी सबगव्हाण येथील ग्रामस्थांनी शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
ज्ञानेश्वर पाटील सरांचे हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण शिक्षकवर्गासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि शिक्षणावरील निष्ठा असेल तर यश नक्कीच मिळते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *