कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या सामाजिक साधनेचा “भारतरत्न ” सन्मानाने गौरव व्हावा…..गजानन नागे* *या मागणीला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचाही पत्रांव्दारे दुजोरा*
![]()
*कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या सामाजिक साधनेचा “भारतरत्न ” सन्मानाने गौरव व्हावा…..गजानन नागे*
*या मागणीला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचाही पत्रांव्दारे दुजोरा*
*अकोला* – समाजातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद निर्माण होऊन संबंध मानवी सुखी व्हावा या उदात्त उध्देशाच्या कर्मपूजेने माणूस घडवून निरोगी समाजव्यवस्थेसाठी आपले सारे आयुष्य खर्ची घालणाऱ्या विदर्भातील कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना भारताचा सर्वोच्च नागरी भारतरत्न हा मरणोत्तर पुरस्कार त्यांच्या कर्मसाधनेचा कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा अशी मागणी गजानन नागे सरचिटणीस विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज संघ मुंबई यांनी केली आहे.
यासंबंधीचा मागणी प्रस्ताव त्यांनी भारताचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस, राज्यपाल महामहिम देवव्रतजी, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, विदर्भ पुत्र परिवहन मंत्री, कार्यसम्राट नेतृत्व प्रतापराव सरनाईक, तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष जी शेलार, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूलमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज संघाच्या वतीने मागणी पत्र देऊन श्री गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
श्री संत गाडगेबाबांचे कार्य सर्व जनतेला परिचित असून गावोगावी आणि शहरा शहरांमध्ये श्री गाडगे बाबांनी गोरगरीब जनतेसाठी केलेले अविस्मरणीय कार्य अजरामर झालेले आहे.अनिष्ट रूढी परंपरा व अज्ञानावर प्रहार करीत माणसाला माणूस म्हणून जगण्याचं रहस्य सांगणारे निरक्षर गाडगेबाबा हे चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून आजही संदेशातून जीवंत आहे.नव्हे मानवी समाजाला तारणाऱ्या याच बाबांचं नाव देऊन अमरावतीचं विद्यापीठ हे “संत गाडगे बाबा विद्यापीठ” म्हणून समोर आलेलं आहे. समाजासाठी एवढं उत्तूंग परोपकारी कार्य करणाऱ्या या महापुरूषांना आत्तापर्यंतच भारतरत्न सन्मान दिला जायला पाहिजे होता.तो आता त्यांच्या १५० व्या जयंती वर्षात दिला जावा.ह्या फक्त वैदर्भियनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनभावना आहेत.
बाबांच्या संदेशाप्रमाणे, निराधार गरजूंना आश्रम शाळा ,शिक्षणासाठी विद्यालये, मुंबईत कॅन्सरग्रस्त रुग्णांना धर्मशाळा असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. त्यांत बाबांच्या प्रत्यक्ष भूमिका आणि त्यांच्या कृतिशील विचारांनी भारावलेल्या शिष्य तथा जनतेचे योगदान आहे. या भारत देशाला स्वच्छ गाव, स्वच्छ शहर हा मंत्र सर्वप्रथम गाडगेबाबांनी दिला. त्यांचे ग्रामसफाई चे कार्य,तसेच गोरगरीब मुलांचे शिक्षण, मुक्या जनावरांना अन्न व निवारा, गोरगरीब मुला मुलींचे लग्नं,गोरगरीबांना औषधोपचार मिळाले पाहिजेत ह्या या ध्येयवेड्या संतांच्या अपेक्षा होत्या.या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.त्यांच्या संदेशांनीच संपूर्ण देश व महाराष्ट्र राज्य काम करीत आहे. गाडगेबाबांच्या या कार्याचा व त्यांचाही गौरव म्हणून त्यांच्या १५० व्या जयंती वर्षात त्यांना शासनाकडून देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी विदर्भ वैभव मंदिर मुंबई व विदर्भ समाज संघाचे कार्यकारी विश्वस्त गजानन देविदास नागे यांनी केली आहे.त्यांच्या या मागणीला दुजोरा म्हणून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने सुध्दा मा.पंतप्रधान,या.मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना या संदर्भातील पत्रे पाठवून ही मागणी केलेली आहे

