संत सावता माळी मंदिरात विघ्न – समाजकंटकांवर तात्काळ कारवाईची मागणी  महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक; अटक न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा
1 min read

संत सावता माळी मंदिरात विघ्न – समाजकंटकांवर तात्काळ कारवाईची मागणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक; अटक न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा

Loading

संत सावता माळी मंदिरात विघ्न – समाजकंटकांवर तात्काळ कारवाईची मागणी

महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक; अटक न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा

अमळनेर प्रतिनिधी :
धुळे येथील नगावबारी परिसरातील प्रियदर्शनी नगर येथे ६ फेब्रुवारी रोजी संत श्रेष्ठ सावता महाराज मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सांगता सोहळ्यादरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पवित्र धार्मिक सोहळ्याच्या वेळी काही समाजकंटकांनी मंदिर परिसरात घुसून मंडपाची तोडफोड केली, साहित्याचे नुकसान केले तसेच भाविकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
या निंदनीय घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत महाराष्ट्र माळी समाज महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांनी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याची ठाम मागणी केली आहे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महासंघाचे प्रदेश संघटक तसेच श्री. सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था, अमळनेरचे अध्यक्ष प्रविण बी. महाजन यांनी दिला आहे.
प्रविण महाजन यांनी दि. ७ रोजी सकाळी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी घटनेतील तोडफोड, विटंबना व भाविकांवर झालेल्या अपमानास्पद वर्तनाबाबत संताप व्यक्त केला. “धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा प्रवृत्ती समाजात अस्वस्थता निर्माण करतात. प्रशासनाने कठोर भूमिका घेत आरोपींवर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला असून, लवकरच पोलिस आयुक्तांची भेट घेऊन पुढील कायदेशीर आणि आंदोलनात्मक भूमिका निश्चित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे समाजबांधवांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तत्काळ कारवाई करून दोषींना शिक्षा द्यावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *