नागपूर ची कन्या प्रियंका खांडेकर ला राष्ट्रपती पुरस्कार ने सन्मानित,अभिमानाने भरलेला क्षण
![]()
नागपूर ची कन्या प्रियंका खांडेकर ला राष्ट्रपती पुरस्कार ने सन्मानित,अभिमानाने भरलेला क्षण
डॉ. राजेश सोनुने* * *(नागपूर विशेष प्रतिनिधी)*
ऑपरेशन सिंदूर दरम्यान केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 26 जानेवारी 2026 रोजी
फ्लाइट लेफ्टनंट प्रियांका खांडेकर यांना Air Officer Commanding-in-Chief Commendation Award जाहिर करण्यात आला.
मूळच्या नागपूरच्या रहिवासी असलेल्या फ्लाइट लेफ्टनंट प्रियांका खांडेकर या VNIT, नागपूर येथून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या पदवीधर आहेत.
यांचे वडील श्री. संतोष खांडेकर, सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी, मोर्शी (अमरावती ग्रामीण) म्हणून कार्यरत आहेत*. या सन्मानाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की,
“हा माझा गणवेशातील शेवटचा प्रजासत्ताक दिन असून, त्याच दिवशी नियतीने माझ्या मुलीला सन्मानित केलं. गणवेशातील एका अभिमानी वडिलांकडून, राष्ट्रसेवेत उभी असलेली आपली लेक पाहणाऱ्या अजून अभिमानी वडिलांपर्यंतचा हा प्रवास—हा क्षण आयुष्यभर मनात कोरला जाईल.”
सध्या फ्लाइट लेफ्टनंट प्रियांका खांडेकर या पाकिस्तान सीमेजवळील पठाणकोट येथे कार्यरत आहेत.

