माणसातिल देवमाणूस…!* खा.डॉ.श्रीकांतजी शिंदे *-प्रशांत भामरे*
![]()
*माणसातिल देवमाणूस…!*
खा.डॉ.श्रीकांतजी शिंदे
*-प्रशांत भामरे*
शब्दांकन: ठाणे: कल्याण ( मनिलाल शिंपी)
नेहमीच्या धावपळीत असतानाच मला एक निनावी फोन आला शेवटचा नंबर होता 694… मी म्हटलं आपण कोण बोलतायेत ? पलीकडून आवाज आला,सर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला एक शिक्षक धनराज कुंनगीर सर बोलतोय.मला तुमचा नंबर माझे मित्र दिपक दिनकर सर आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी दिला आणि तो फोनवरच धाय मोकलून रडायलाच लागला.सर माझ्या मुलीला वाचवा हो.ती मरणाच्या दारात उभी आहे आणि ती केवळ चार वर्षाची आहे अहो सर तिचे खेळण्याचं, बागलण्याचं व जगण्याचं असताना ती एकप्रकारे मृत्युशी झुंज देत आहे,लढा देत आहे,तीव्र संघर्ष करीत आहे सर…!
कृपया आपण मला कुठूनतरी काहीतरी वैदेकीय वा आर्थिक मदत मिळवून द्या,आपणच माझे संकटकाळातील खरे संकटमोचक आहात.सर आपण माझं संकट दूर कराल याचा मला ठाम विश्वास वाटतो.मी अत्यंत शांतपणे एकाग्र होऊन त्यांची कैफियत व व्यथा ऐकत होतो. मी म्हटलं…सर मी जरा गावी आलो आहे एक /दोन दिवसांनी आलो की आपण प्रत्यक्ष भेटून बोलूया तुम्हाला स्वतः मी फोन करतो आल्यानंतर मी त्यांना फोन केला सर तुम्ही या मी कल्याणात आलो आहे आपण काय तो मार्ग काढू या मी आणि माझे मित्र श्री.विलास जाधव व अनंत किंनगे आम्ही त्यांना शिवसेना वायले नगर शाखेत बोलावून घेतले.
आई,बाबा आणि त्यांच्या 4 वर्षाच्या आजारग्रस्त चिमुकलीला घेऊन माझ्याकडे आले त्या मुलीच्या डोळ्यात काहीतरी सद्भावना होत्या ती माझ्याकडे एकटक बघत होती परंतु ती अज्ञान असल्याने भविष्यात काय वाढवून ठेवले तिला काहीही ज्ञात नव्हतं तिच्या आजाराबद्दल तिला काहीच माहित नव्हतं आई-वडिलांच्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांच्या अश्रूंना बांध फुटला आणि धाय मोकलून रडायला लागले मी त्यांना शांत केल ते बोलले सर माझी चार वर्षाची मुलगी राघवी आम्हाला तिच्या औषधोपचारासाठी काही 25 हजाराची मदत मिळेल काय ? मी म्हटलं तिला आजार काय आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की तिला अत्यंत असाध्य *थालेसिमिया* हा आजार झाला आहे तो मेजर स्वरूपात आहे त्यामुळे तिचं रक्त तयार होत नाही दर पंधरा दिवसांनी रक्त द्यावं लागतं.एक डोनर भेटलेला आहे पण त्याचाच खर्च 12 लाख रुपये आहे. आजाराचं गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घेता मी म्हटले 25 हजाराच्या तुटपुंज्या मदतीने तुमचं काहीच होणार नाही हॉस्पिटलचा 35 लाख खर्च अफाट आणि अवाढव्य आहे. त्यामधील 15 लाख हॉस्पिटल मदत करणार आहे मग मी विचारलं यापैकी तुम्ही किती रकमेची तरतूद केलेली आहे आपल्याला किती रकमेची गरज आहे.आई-वडील म्हटले सर्व जमापुंजी एकत्र करुन सध्यस्थितीत आमच्याकडे चार ते 5 लाख रुपये आहेत.मग माझं विचारचक्र सुरु झालं.एवढी मोठी मदत उभी करणं गरजेचं आहे. गरज हीच शोधाची जननी असते आणि माझ्यासमोर दुर्मिळातील दुर्मिळ दातृत्वगुण असणारे,मदतीसाठी सदैव तत्पर असणारे,सर्वांसाठी उपलब्ध असणारे,दुसऱ्यांच्या दुःखात धावून जाणारे आणि तमाम महाराष्ट्राचे आरोग्यदूत असणारे आणि 400 ते 500 लहान मुलांच्या हृदयाचे विनामुल्य ऑपरेशन करुन जीवनदान देणारे…अमोघ वकृत्व,अफाट कर्तुत्व,अजोड नेतृत्व,अजेय शूरत्व आणि असीम दातृत्व या पंच गुणांचा सुरेख संगम असलेले पंचमदा म्हणजेच कल्याण लोकसभा मतदार संघांचे लाडके,लोकप्रिय व लोकहितवादी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे होय….!
डॉ.श्रीकांत शिंदे म्हणजे रुग्णांचे तारणहार,रुग्णांचे मदतगार,रुग्णांना अत्युचं दर्जाची सेवा,मदत व सुविधा उपलब्ध करुन देणारे पृथ्वी तलावरील साक्षात देवदूतच….!
मी क्षणाचाही विलंब न लावता त्या पालकांना म्हटलं आपण खासदार श्रीकांत शिंदे साहेबांकडे जाऊ या साहेबांना आपली सर्व परिस्थिती व व्यथा समजावून सांगू साहेब नक्की त्याच्यातून काहीतरी मार्ग काढतील हा माझा आत्मविश्वास होता कारण एक शिवसैनिक म्हणून व शिवसेनेचा विधानसभा समन्वयक म्हणून साहेबांची काम करण्याची पद्धती, प्रश्न समजून घेण्याची आणि प्रश्न सोडविण्याची क्षमता मी अनेकवेळा अनुभवली आहे. साहेबांनी दिलेला शब्द कधी मोडला नाही आणि लिहिलेला शब्द कधी खोडला नाही.याची जाणीव असल्यामुळेच मी एक -दोन दिवसानंतर कालहरण न करता मी साहेबांचे स्वीय सहाय्यक *श्री.अभिजीत दरेकर आणि श्री.प्राजक्त झावरे पाटील* यांना फोन केले त्यांनी सांगितलं की साहेब कल्याण पूर्वला येणार आहेत तुम्ही त्या पालकांना घेऊन या मी लगेच पालकांना फोन केला आपल्याला खासदार श्रीकांत शिंदे बोलावलेले आहे सर्व मेडिकल फाईल सोबत घेऊन या

साहेबांचा दरबार म्हटला की कल्याण लोकसभा नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेले,त्रासलेले नागरिक त्या ठिकाणी येऊन आपल्या समस्या व प्रश्न घेऊन येतात आणि सोडवून निघून जातात.येताना नागरिकांच्या चेहऱ्यावर दुःख व चिंता असते परंतु जाताना मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंदाचे हसू व समाधान असतं त्या दिवशी साहेबांचा दरबार होता हजारोंच्या संख्येने नागरिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले होते परंतु हा विषय थोडा सेन्सिटिव्ह असल्याने मी पोचल्यानंतर अभिजीत दरेकरांना फोन केला व विनंती केली त्यांनी लगेच साहेबांची भेट घडवून दिली साहेबांसोबत आई-वडील त्या मुलीची गंभीर आजाराविषयी माहिती देताना आई-वडिलांना रडू कोसळले प्रथमता साहेबांनी त्यांना शांत व्हा.धीर धरा.पाणी घ्या.आपण मार्ग काढू
नंतर साहेबांनी त्या 4 वर्षाच्या चिमुरडीच्या आजारपणा विषयी सखोल माहिती घेतली व मुलीच्या डोक्यावरून मायेचा व प्रेमाचा हात फिरवला. त्यामुळे मुलगी त्यांच्याकडे खूप आशेने बघत होती साहेबांनी क्षणाचाही विचार न करता अभिजीतला सांगितलं की आपल्याला यांना मदत करायची आहे, काय असेल ती सगळी माहिती घे आणि यांना त्वरीत बंगल्यावर बोलावून घे.आम्ही भेट घेऊन घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी अभिजीत चा फोन आला आणि सांगितलं भामरे सर पालकांना व मुलीला घेऊन तुम्ही बंगल्यावर या मुलीला आणि आई-वडिलांना घेऊन बंगल्यावर गेलो बंगल्यावर सुद्धा अनेकांची त्या ठिकाणी भेटण्याची गर्दी होती.अभिजीतला कळलं की आम्ही आलो आहोत.अभिजितने क्षणाचाही विलंब न करता आम्हाला बोलवून घेतलं आणि सांगितले की श्रीकांत शिंदे निरोप आहे की या चिमूरडीच्या आजारपणाच्या उपचारासाठी आपल्याला सर्व प्रकारची मदत करायची आहे. सोमवारी तुम्ही कोकिलाबेन हॉस्पिटल, मुंबई येथे जा.डॉक्टरांना ट्रीटमेंट सुरु करायला सांगा आणि
*हॉस्पिटलचा खाते क्रमांक* मला पाठवा.आपण संपुर्ण 15/20 लाखाची मदत करु.निश्चिन्त रहा.आम्हाला आणि पालकांना वाटलं होत की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री सहायता निधी मधून दोन-चार लाख रुपये देतील किंवा इतर शासकीय मदत करतील परंतु अभिजीत बोलले की संपुर्ण 15/20 लाख रुपये खर्चाची जबाबदारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उचलली आहे.हे वाक्य ऐकून माझ्या आणि पालकांच्या आनंदात पारावार उरला नाही. आई-वडील दोघांच्या आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले…मात्र डोळ्यात आलेले अश्रू हे आनंदाचे,समाधानाचे,जीव्हाळ्याचे,
प्रेमाचे,स्नेहाचे आणि आपुलकीचे होते…!
एक ऋणानुबंध साहेबांनी त्या ठिकाणी जपला.एक सुंदर नातं जुळलं आणि समाधान आणि आनंदाची शिदोरी घेऊन आम्ही खाली उतरलो. आनंदाने सुखावलेल्या चेहऱ्याने
साहेबांना त्या आई-वडिलांनी मनोमनी शुभेच्छा दिल्या
*काही माणसं ताडामाडा प्रमाणे उंच वाढवून स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात आणि काही माणसं मात्र वटवृक्षाप्रमाणे वाढून दुसऱ्यांना सावली,आधार, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी,ऋणानुबंध,स्नेह,देण्याचा प्रयत्न करतात ते वटवृक्ष म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे*
आणि मलाही आत्मसुखाचा, आत्मसमाधानाचा व आत्मानंदाचा सुखद अनुभव घेता आला.आणि माझ्या मुखातून सहज एक शब्द बाहेर पडला तो म्हणजे
“होय,माणसात देव दिसला, देव अनुभवला डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या रुपाने.
कल्याण लोकसभेचे खासदार ठिकाणी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो
अशी माहिती शिवसेना विधानसभा समन्वयक कल्याण पश्चिम प्रशांत तुकाराम भामरे यांनी दिली आहे.

