बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन*
![]()
*बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन*
*जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा)– :*
राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त किंवा सदस्य असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत सन २०२५-२६ साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक बौद्ध संस्थांनी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्ज स्वीकारण्याची मुदत ०५ फेब्रुवारी २०२६ ते २० फेब्रुवारी २०२६ अशी असून, विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
दरम्यान, शासन निर्णय दि. ०७ ऑक्टोबर २०२४ अन्वये या योजनेअंतर्गत पायाभूत सोयी-सुविधांसाठीची अनुदान मर्यादा रुपये २ लाखांवरून वाढवून रुपये १० लाख करण्यात आली आहे. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सर्व इच्छुक संस्थांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सदस्य सचिव, उच्च स्तरीय निवडसमिती, तथा जिल्हा नियोजन अधिकारी भरत सांळुके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

