अमळनेरात गजानन भक्तांचा महासंगम; रविवारी प्रकट दिन सोहळा
1 min read

अमळनेरात गजानन भक्तांचा महासंगम; रविवारी प्रकट दिन सोहळा

Loading

अमळनेरात गजानन भक्तांचा महासंगम; रविवारी प्रकट दिन सोहळा

अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर शहरातील दादासो जी. एम. सोनार नगर, मुंडडा नगर – १ जवळील श्री गजानन महाराज मंदिरात येत्या रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी परमपूज्य श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पावन दिनानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा.आर.बी पवार व महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार
यांनी केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटेच भक्तिमय वातावरणात होणार आहे.
सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व आरती होईल. त्यानंतर सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत पवित्र लघुरुद्र अभिषेक (पादुका पूजन) विधी पार पडणार असून हा सोहळा श्री. नितीन भावे गुरुजी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यानंतर सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत भाविकांसाठी सामूहिक चक्रभ्रमण पारायण आयोजित करण्यात आले आहे. तर सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत महाराजांच्या महिम्याचे वर्णन करणारे मंगलमय सत्संग होणार आहे, ज्यामुळे भक्तांना अध्यात्मिक उर्जा व समाधान लाभणार आहे.
भक्तांसाठी महत्त्वाचा भाग असलेला महाप्रसाद कार्यक्रम दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आला असून सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन श्री गजानन महाराज सेवा संस्था, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे. भक्तांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून महाराजांचे दर्शन घ्यावे व कार्यक्रमांना हजेरी लावून प्रकट दिन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *