मानवतेचा धर्म आणि समानतेची शपथ — गांधी विचारांचा प्रभावी जागर  गिरीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन • पथनाट्यातून समता, स्वच्छता व मानवतेचा संदेश
1 min read

मानवतेचा धर्म आणि समानतेची शपथ — गांधी विचारांचा प्रभावी जागर गिरीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन • पथनाट्यातून समता, स्वच्छता व मानवतेचा संदेश

Loading

 

मानवतेचा धर्म आणि समानतेची शपथ — गांधी विचारांचा प्रभावी जागर

गिरीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन • पथनाट्यातून समता, स्वच्छता व मानवतेचा संदेश

अमळनेर प्रतिनिधी- गांधी रिसर्च फाउंडेशन द्वारा आयोजित महात्मा गांधी यांच्या समरण दिन निमित्ताने *ग्राम संवाद सायकल यात्रा* चे उपक्रम प्रताप कॉलेज येथिल पूज्य साने गुरुजी सभागृहात 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 ते 9 पर्यंत प्रबोधनात्मक समारंभ संपन्न झाले, जन जागृती प्रबोधन पथ नाट्य *आवो लकीरे मिटा दे* आपल्या मनातील भेद,द्वेष दूर करून गांधींच्या समतावादी भारत निर्माण करण्याचा हेतू प्रस्तुत कार्यक्रमाचा आहे, या उपक्रमात विविध राज्यांतील 32 जणांची टीम या ठिकाणी आली होती.
त्यांनी पथ नाट्य द्वारे स्वच्छता, मनातील द्वेष दूर करणे,*बापूजी का एक ही सपना स्वच्छ भारत अपना*, मानवी मूल्य संवर्धन, नैतिकता,कोणतेही काम उच्च-निच्च नाही, हक्क-अधिकार,समानतेची गरज,जातीवाद निर्मूलन,संप्रदाय एकता,भविष्यातील भारत कसा राहिले पाहिजे,मानवता सर्वात मोठा धर्म,चरित्र की सिडी हे सदाचरण आहे,दुस-याची सेवा हीच खरी पूजा आहे, नम्रता,आत्मविश्वास,अशा स्वरूपाचे प्रबोधनात्मक पथ नाट्य सादर केले,याकरिता गिरीश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.सर्वात शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी समानतेची प्रतिज्ञा घेतली.
पूज्य साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे तामिळ मध्ये भाषातंरीत करण्याचे कार्य फारुखजी यांनी केले,त्यांनी सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रस्तुत कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी एनसीसी,राष्ट्रीय सेवा योजना,हॉस्टेलचे विद्यार्थीनी, सी सी एम सी व वाणिज्य विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एच डी जाधव,डॉ विजय तुंटे,डॉ.संदीप नेरकर, डॉ हेमंत पवार,
डॉ.बालाजी कांबळे,डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.सचिन पाटील, डॉ.प्रियंका पाटील,प्रा.अमोल अहिरे,दिलीप शिरसाठ,पराग रविंद्र पाटील,अतुल धनगर,विशाल अहिरे यांनी सहकार्य केले.प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.विजय तुंटे यांनी केले तर डॉ.हेमंत पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *