आनंद मेळावा, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे साजरा
![]()
आनंद मेळावा, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे साजरा
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या आनंददाय कार्यक्रमाचे उद्घाटन वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले आणि सर्वांनी आनंदाने त्या पदार्थांचा आनंद घेतला.
कार्यक्रमाची यशस्विता सुनिश्चित करण्यात प्रमुख भूमिका प्राचार्या गायत्री भदाणे मॅडम, कुंजल पाटील मॅडम, उष्कर्षा मॅडम, वैशाली मॅडम तसेच ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर, विजय चौधरी सर, राजु पाटील, उमेश पाटील, सखाराम पावरा यांनी घेतली.
हा आनंद मेळावा विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायक अनुभव ठरला आणि शिक्षण संस्थेच्या एकोणचं वातावरणाने सर्व उपस्थितांना आनंदित केलं.

