सकल जनाच्या हिताचा व मानवतेचा विचार मांडणारे संत रविदास !!!
![]()
सकल जनाच्या हिताचा व मानवतेचा विचार मांडणारे संत रविदास !!!
भारतामध्ये विविध राज्यामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. या संतांमध्ये उत्तर प्रदेशांमध्ये एक विश्वाच्या मानवाचा विचार करणारा संत होऊन गेला तो म्हणजे संत रविदास.. संत रविदास यांना विविध नावांनी संबोधले जाते. कोणी त्यांना रोहीदास,रैदास,रविदास अशा नावांनी ओळखले जाते. संत रविदास यांच्या जन्म वाराणसी येथील मांढुरगड येथे १५ फेब्रुवारी १३९८ ला माघ पोर्णिमा वार रविवार या दिवशी झाला. त्यांचे आजोबा रघुनंदन पिढीजात बुटांचा व्यवसाय करायचे. ते संस्कार रघुराम यांच्यावर पडले. आजीचे नाव चैत्राकोर होते. अगदी सज्जन, मनमिळाऊ स्वभावाचे होते. रविदासांच्या वडिलांचे नाव रघुराम असे होते. आईचे नाव करमादेवी होते. संत रविदास यांचा जन्म रविवार या दिवशी झाल्यामुळे त्यांना रविदास असे म्हणण्यात येते. संत रविदास यांचे वडील व आई वाराणसी जवळील बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक रैवत प्रज्ञ यांच्या संपर्कामध्ये होते. रैवतप्रज्ञ यांच्याकडे ते नेहमी जात असत. अनेक विषयांवर त्यांची चर्चा होत असे. रघुराम यांचा बुटांचा व्यवसाय होता. राजे ,सरदार , श्रीमंत लोक यांचे ग्राहक होते. उत्कृष्ट चामडी बुट बनवण्यात रघुराम प्रख्यात होते. घोड्यासाठी लागणारे साहित्य त्यांच्याकडे मिळत असे.रघुराम त्यांच्याकडे अनेक लोक चामडी चपला बुट व चामडी वस्तू बनविण्यासाठी माणसे होती. व्यवसायामुळे ते श्रीमंत होते. तोच व्यवसाय रविदासाने पुढे चालविला होता. विचारवंत रैवतप्रज्ञ यांच्या नावावरून रघुराम यांनी रैवतदास असे नाव आपल्या मुलाचे ठेवले होते. हिंदी भाषेमध्ये रैवतदास चे रैदास झाले. महाराष्ट्रात रोहिदास असे म्हटले जाते. वडील रघुराम अभ्यासू व्यक्तिमत्व होते. आपले नित्यनेमाने काम करून लोकांशी मानवतेच्या विषयावर बोलत असत. त्यांच्या विचारांचा प्रभाव संत रविदास त्यांच्यावर पडला होता. आई घरातील सर्व कामे सांभाळून वडिलांना मदत करीत असे. सर्व प्रकारची चप्पल ,बुट, चामडी वस्तू बनवण्यासाठी लागणारे चामडे रघुराम आपल्या चांभार कुंडावर सुकवून आणायचे..
चवर राज घराण्यातील हे लोक होते. मनुवादयांनी केलेल्या प्रतिक्रांतीनंतर हे घराणे अस्पृश्य ठरले. आपल्या आई-वडिलांचे पुरोगामी विचार यामुळे संत रविदास प्रगल्भ विचाराचे बनले. संत रविदासांना जास्त शिक्षण घेता आले नाही. समाजात निर्माण झालेल्या जातिभेदावर संत रविदास यांनी सखोल विचार केला. सर्वांना समान न्याय पाहिजे या विचाराचे ते होते. बुद्धांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर वडिलांमुळे झाला. काशी जवळ बुद्ध विचाराचे अनुयायी आपल्या विहारात राहत असत. रघुराम व करमादेवी यांच्याकडे काही प्रचारक येत असत. त्यांचा विचार समतावादी विचार होता. संत रविदासांनी जातिभेदावर आधारलेली व्यवस्था अभ्यासली. त्यांनी आपल्या विचारांनी अनेक काशीतल्या पंडितांना वैचारिक मंथनात निरुत्तर केले. संत रविदासांचा वास्तववादी विचार लोकांना पटू लागला. संत रविदासांनी राम म्हणजे आतील चैतन्य असे मानले.देवाबददलचा लोकांचा कर्मकांडी दृष्टिकोन बदलविला. ते आपल्या भजनामध्ये म्हणतात “जो खुदा पश्चिम बसे, तो पूरब बसे राम! रविदास सेवो जिह ठाकुर कु,तिह का ठाव न नाम”म्हणजेच खुदा म्हणजे अल्ला पश्चिम दिशेला बसलेला आहे व पूर्व दिशेला राम आहे. परंतु संत रविदासाचा जो देव आहे तो त्याचे नाव व ठिकाणा नाही. संत रविदास माणसांमधील माणुसकीला देव मानत. बुद्ध प्रमाणे आत्मा, परमात्मा ते मानीत नसत. संतांनी कधीही चमत्कार केलेले नाही. संत रविदास चमत्कारांच्या विरोधात होते. परंतु मनुवाद्यांनी त्यांचा इतिहास लिहिताना चमत्काराच्या कथा सांगून त्यांचे पुरोगामी विचार पुढे येऊ दिले नाही.ते म्हणतात “मजेत सो कहू घिन नही मंदिर सो,दोहु म राम अल्ला नही कहे रैदास चमार” . मंदिर व मज्जित यातील भगवान ला त्यांनी नाकारलेले आहे. कर्मकांडी विचारामुळे यांनी कधी माथा टेकवला नाही. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये एकता निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. हे आपल्या भजनात म्हणतात”मुसलमान से दोस्ती हिंदूवन कर प्रीत”मुसलमानाशी माझी दोस्ती आहे आणि हिंदू वर प्रेम आहे. अस्तित्वात बसलेल्या देवाबद्दल त्यांनी दोन्ही धर्माच्या लोकांना फटकारले आहे.”देता रहे हजार बरस,चाहे अजान,
रैदास खुदा ना मिल सके जो लौ मन सैतान”मनात राक्षसी विचार असतील तर कोणत्या लोकांना देव म्हणजे खऱ्या अर्थाने मानवता मिळू शकणार नाही. असे रोखठोक विचार त्यांनी समाजाला दिले. हिंदू धर्मातील कर्मठ ब्राह्मण सांगत असलेल्या वेदांच्या गोष्टीबद्दल त्यांनी तीव्र शब्दात प्रहार केलेला आहे. ते म्हणतात “जीवन चारि दिनो का मेला रे!
ब्राह्मण झुठा, वेद भी झुठा, ब्रह्मा भी अकेला रे” अशा कठोर शब्दात त्यांनी वेद आणि ब्राह्मण यांनी मांडलेल्या कर्मकांडी विचारावर प्रखर भाष्य केलेले आहे. त्या काळामध्ये पुरोहितांनी मिळालेला पाप पुण्याचा बाजार याला संत रविदास यांनी प्रबोधनात्मक काम करून थांबविला. त्यांनी ब्राह्मण लोक मानत असलेल्या वेदालाही खोटे असल्याचे सिद्ध केले. आपली उपजीविका सांभाळून भारतभर भ्रमंती केली. संत कबीर व संत रविदास हे एका विचाराचे संत होते. जातीप्रथेबाबत ते म्हणतात,”जात पात के फेरमे , उरझी रहयो सब लोग,मानवता को छोडि करी,रचयो पाखंड योग”. जातीपातीच्या राजकारणामध्ये सकल समाज भरकटला आहे. मानवता सोडून तो वेगळ्या च वाटेने जात आहे. त्या काळात काशी बाबत ब्राह्मणांनी अंधश्रद्धा पसरवलेल्या होत्या. काशीला स्नान केल्यावर माणूस पवित्र होतो अशी कंडी उठविली होती. पापमुक्त होण्यासाठी काशीला यज्ञ याग केले पाहिजे यासाठी ब्राह्मण काशीचा प्रचार करीत असत. त्यातून त्यांना अमाप पैसा मिळत आहे. त्यावर संत रविदास यांनी आपल्या दोहयामध्ये म्हटले आहे ,तीरथ नही पावन करे,पावन करे सुभाव”कोणत्याच धर्माचे ठिकाण माणसाला पवित्र करू शकत नाही. माणसाचा स्वभावच मानवाला पवित्र करीत असतो. बुद्धांच्या विचारांमध्ये आणि संत रविदासाच्या विचारांमध्ये समानता दिसून येते. सकल विश्वाच्या मंगलतेचा विचार संत रविदास करत होते. ते म्हणतात, ऐसा चाहू राज मे, जहाँ मिले सबन को अन्न, छोटा बडा सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न”त्यांनी म्हटले की मी केव्हा आनंदित होईल जेव्हा या देशामध्ये लहान मोठा, गरीब श्रीमंत अशा सर्व लोकांना पुरेसे अन्न मिळेल . सर्व जात-पात धर्म गरीब श्रीमंत विसरून एकत्र नांदतील तेव्हाच मला प्रसन्न वाटेल. त्यांनी आपल्या भजनातून, दोहयामधून समानतेचा, न्यायाचा, बंधुत्वाचा, करूणेचा विचार दिला. संत रविदास बुद्धाप्रमाणे शीलसंपन्न होते. अनेक वेळा त्यांनी काशीच्या पंडितांना आपल्या ज्ञानाने हरविले. ब्राह्मणांनी अनेक वेळा संत रविदासांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. संत रविदास यांचे विचार रानी झाला व संत मीराबाई सारख्या राज घराण्यातील राण्यांनी स्वीकारला. इतिहासकारांनी संत रविदास यांना संत रामानंद यांचे शिष्य लिहून बदनाम केले. संत रामानंद हे मूर्ती पूजक होते. त्यांच्या विचारात व संत रविदास व कबीर यांच्या विचारांमध्ये खूप फरक आहे त्यामुळे संत रविदास व कबीर रामानंद यांचे शिष्य होऊ शकत नाही. संत रविदास यांच्या काल्पनिक कथा लिहून त्यांचे मूळ विचार संपविण्याचा प्रकार ब्राह्मणांनी केला. संत रविदास यांना चितोडगड येथील राजाच्या महालातील मंदिरात संत मीराबाई यांच्या आग्रहास्तव गेलेल्या ठिकाणी मनुवादी विचाराच्या लोकांनी त्यांची हत्या केली. त्यांचा देह चैतन्यात विलीन झाला असे सांगून या हत्यावर पांघरून घालण्यात आले. आपली शिष्या मिराबाई हिलाही ते कळू दिले नाही. संत रविदासांनी विवेकी विचाराचा, चिकित्सक विचाराचा आयुष्यभर प्रचार प्रसार केला. त्यांच्या या अप्रतिम कार्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका पुस्तकाला त्यांच्या नावे समर्पित केलेले आहे. जातिभेदाच्या भिंती तोडण्यासाठी अखंडपणे प्रयत्न केला. संत रविदासांनी बे गमपुरा नावाची रचना करून त्यांना अपेक्षित असलेली मानवतावादी ठिकाण झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
लेखक
एस.एच.भवरे
विशेष प्रतिनिधी
मराठी लाईव्ह न्युज
.

