लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध* *नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार*
![]()
*लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध*
*नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार*
जळगाव, दिनांक 30 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा):
जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिन आयोजित केला जातो. नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च व श्रम वाचावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने लोकशाही दिनासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया आता अधिक सुलभ व ऑनलाईन केली आहे.
दिनांक २ फेब्रुवारी,२०२६ आणि यापुढील होणाऱ्या सर्व लोकशाही दिनांसाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही. नागरिकांना आपले अर्ज जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (jalgaon.gov.in) ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत.
लोकशाही दिनासाठी अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया दर महिन्याच्या १ तारखेपासून १५ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यांचा आढावा पुढील लोकशाही दिनात घेण्यात येणार आहे.
लांब असलेल्या तालुक्यातून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष येण्याऐवजी नागरिक व शेतकऱ्यांनी या आधुनिक ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
*******

