निम येथील सुपुत्र जयेश चौधरी यांची परदेशात भरारी : नोकरीसाठी डब्लिनकडे प्रयाण
1 min read

निम येथील सुपुत्र जयेश चौधरी यांची परदेशात भरारी : नोकरीसाठी डब्लिनकडे प्रयाण

Loading

निम येथील सुपुत्र जयेश चौधरी यांची परदेशात भरारी : नोकरीसाठी डब्लिनकडे प्रयाण

अमळनेर प्रतिनिधी
निम येथील सुपुत्र जयेश चौधरी याने आयर्लंडमधील डब्लिन येथे एम.एस. (Master of Science) पदवी यशस्वीरीत्या पूर्ण करत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, आता उच्च दर्जाच्या नोकरीसाठी तो पुन्हा डब्लिन (आयर्लंड) येथे रवाना झाला आहे.
एम.एस. पदवी पूर्ण केल्यानंतर जयेश काही काळ भारतात परतला होता. दरम्यान त्याला आयर्लंडमधील नामांकित क्षेत्रात नोकरीची संधी मिळाल्याने तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डब्लिनकडे प्रयाण केले. यावेळी त्याला निरोप देण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जयेश हा श्री. एन. आर. चौधरी, मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय निंभोरा तसेच सौ. पुष्पलता चौधरी, पदवीधर शिक्षिका, बालमोहन विद्यालय, चोपडा यांचा कनिष्ठ चिरंजीव आहे. शिक्षणाचा भक्कम वारसा लाभलेल्या या कुटुंबातील जयेशने आपल्या जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे.
विशेष म्हणजे त्याचा मोठा भाऊ रोहित चौधरी यानेही परदेशात उच्च शिक्षण (MS in Adaptive Cyber Security) पूर्ण करून कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. दोन्ही भावंडांचे शैक्षणिक यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जयेश चौधरी यांच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो एक प्रेरणास्थान ठरत आहे. त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव दिलीप पाटील, उपाध्यक्ष श्रीमती योगेश्री पाटील सह हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *