अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोर अटकेत, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
![]()
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोर अटकेत, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
अमळनेर प्रतिनिधी
प्रस्तुत बातमीची हकिकत अशी आहे की, मा. पोलीस अधिक्षक डॉ माहेश्वरी रेड्डी सो, जळगांव, मा. अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगांव परीमंडळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनायकराव कोते. सो, मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम सो यांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील पोउपनि शरद काकळीज, पोहेकॉ/1998 मिलींद सोनार, पोकॉ/2826 विनोद संदानशिव, पोकॉ/1311 निलेश मोरे, तसेच पोहेकॉ/1886 चंद्रकांत पाटील, पोहेकॉ/1303 विनोद सोनवणे, पोकॉ/2305 गौरव पाटील, पोकॉ/1978 मिलींद जाधव असे अमळनेर पोलीस स्टेशन कडील गुरंनं 503/2025, गुरंनं 13/2026, भारतीय न्याय संहीता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलींचा व अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना अमळनेर परीसरात चोरी होणारे मोटार सायकल बाबत सीसीटीव्ही कॅमेरा तसेच तात्रींक विश्लेषण तसेच ठिकठिकाणाचा डम डाटा काढुना सदर चोरी करणारे इसम नामे अरबाज शेख साजीद मनियार, वय-28 राहणार-धुळे यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदर इसमानी अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील व एक विधीसंघर्षग्रस्त बालकाने अमळनेर पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केल्याने नमुद अरबाज शेख साजीद मनियार, वय-28 राहणार-धुळे या आरोपीतासा गुन्ह्यात अटक करुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी चोरलेल्या मोटार सायकली या धुळे शहरात लपविल्याचे सांगितल्याने मा. अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगांव परीमंडळ, यांची परवानगी घेवुन तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम सो, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे धुळे शहरात जावुन आरोपीतांकडुन खालील नमुद मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन त्यांचे वर्णन खालील प्रमाणे-
1) 30000/- रुपये कि. ची एक हिरो कंपनीची स्पेंडर प्लस डीआरएस काळया व ग्रे रंगाची मोटर सायकल क्र MH19-EJ5439 चेसीस नंबर MBLHAW238P5J14688 इजिन नंबर HA11E8P5J64565 जु.वा.कि.अं
2) 50000/-रुपये कि.ची सुझुकी कंपनीची Access 125 काळया रंगाची स्कुटी क्र. MH18BY6692 चेसीस नंबर MB8DP12DJN8D28647 इजिन नंबर AF212956515 जु.वा.कि.अं
3) 50000/-रुपये कि.ची सुझुकी कंपनीची Access 125 निळया रंगाची स्कुटी क्र. MH39AN8269 चेसीस नंबर MB8DP12PGR8A15158 इजिन नंबर AF21536307 जु.वा.कि.अं
जु.वा.कि.अं.
130,000/-असे एकुण रुपये किं. चे जप्त मुद्देमाल
तरी वर नमुद आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन एकुण वर नमुद किमंतीच्या मोटार सायकली मिळुन आल्याने वर नमुद मोटार सायकली जप्त करुन तसा सविस्तर पंचनामा करुन अमळनेर पोलीस स्टेशन येथे आणले असुन सदर आरोपीतांना अमळनेर पोलीस स्टेशन कडील गुरंनं 308/2025 भरतीय न्याय संहीता कलम 303 (2) प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ /1886 चंद्रकांत पाटील व गुरंनं 13/2026 भारतीय न्याय संहीता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/1998 मिलींद सोनार हे करीत आहे.

