राज्यातील १२५ विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे तंत्रज्ञान.  नोबेल फाउंडेशनचा १३ वा इस्रो दौरा संपन्न  भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन .सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य
1 min read

राज्यातील १२५ विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे तंत्रज्ञान. नोबेल फाउंडेशनचा १३ वा इस्रो दौरा संपन्न भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन .सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य

Loading

राज्यातील १२५ विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे तंत्रज्ञान.

नोबेल फाउंडेशनचा १३ वा इस्रो दौरा संपन्न

भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन .सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य

जळगाव- चांद्रयान तीनच्या दिव्य यशानंतर तसेच येणाऱ्या गगनयान मिशन मूळे सामान्य भारतीयांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो बद्दल मोठ्या प्रमाणात कुतुहल निर्माण झाले आहे. यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील १२५ विद्यार्थ्यांनी नुकतीच भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला भेट दिली. नोबेल विज्ञान प्रसारक बहुददेशीय संस्था आणि भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे दरवर्षी महाराष्ट्रात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन केले जाते. यातील गुणवंत विद्यार्थ्यांना (इस्रो), विक्रम साराभाई स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर, सायन सिटी यासारख्या उच्च तंत्रज्ञान संस्थांना विनामूल्य भेटीसाठी नेले जाते. सन 2025 मध्ये या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या महाराष्ट्रातील 125 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड झालेली होती. यातील इयत्ता पाचवी ते सातवी मधील ६५ ,इयत्ता आठवी ते दहावी गटातील ६० विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा जानेवारी महिन्यात दोन टप्प्यात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या इस्रो दौऱ्याचे हे तेरावे पर्व होते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी या प्रकारची चळवळ राबवणारी नोबेल फाउंडेशन ही एकमेव संस्था आहे.या दौऱ्यासाठी भवरलाल कांताबाई जैन फाउंडेशन तसेच सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांचे सहकार्य लाभले.
या तीन दिवशी अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी विक्रम साराभाई स्पेस एप्लीकेशन सेंटर येथे उपग्रह बनविण्याच्या पद्धती, उपग्रहांचे प्रकार रॉकेटचे प्रकार, उपग्रह पाठवण्यासाठी रॉकेटच्या इंधनांचा अभ्यास मंगळयान, चंद्रयान तसेच भविष्यात आखणी केलेल्या गगनयान संदर्भात संपूर्ण मॉडेल्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर येथे सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग या व्यासपीठावर आयआयटीच्या तज्ञ प्राध्यापकांकडून माहिती घेतली. आयआयटी गांधीनगरच्या अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशालांचा देखील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. आयआयटी येथे विद्यार्थ्यांनी देशातील सुपर कम्प्युटर परम कम्प्युटर बद्दल माहिती जाणून घेतली तसेच त्याची प्रक्रिया समजून घेतली .अहमदाबाद येथील सायन्स सिटी मध्ये विद्यार्थ्यांनी आशिया खंडातील एक प्रगत रोबोटिक लॅबोरेटरी रोबोटिक पार्कस मध्ये रोबोट तर्फे होणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यपद्धतीचा प्रात्यक्षिकांसह अभ्यास समजून घेतला. वैद्यकीय क्षेत्रात रोबोट तर्फे होणारे शस्त्रक्रिया, कृषी क्षेत्रात रोबोटची भविष्यात होणारी मदत,अंतराळ क्षेत्रात अंतराळयान दुरुस्तीसाठी रोबोटची होणारी मदत यासारख्या गोष्टींचा समावेश होता. यासह भारतातील अद्ययावत तंत्रज्ञान आधारित मत्स्यालय व स्पेस पार्क ला भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे महामंडलेश्वर जनार्दन महाराज ,जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी, ओडिशा येथील सचिव आयएएस राजेश पाटील , मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता एम एम पाटील आदींनी अभिनंदन केले.
इस्रो विज्ञान अभ्यास दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी परीक्षा विभाग प्रमुख विवेक साळुंखे ,राजेंद्र पाटील ,निशांत पाटील ,तुषार सोनार, चिन्मय वारुळे,रमेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन- इस्रो येथे रॉकेटच्या मॉडेल्सह इस्रो दौऱ्यासाठी निवड झालेले नोबेल फाउंडेशनचे विद्यार्थी सोबत संचालक जयदीप पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *