व्ही. एस. पवार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*
1 min read

व्ही. एस. पवार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*

Loading

*व्ही. एस. पवार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*

दुर्गा फाउंडेशन संचालीत कै.श्री. दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा 77 वा गणतंत्रदिन शाळेत देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मा. श्री उत्कर्ष पवार, संस्थेच्या सचिव सौ.अलका पवार व उपाध्यक्ष मा.श्री उमाकांत पाटील यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन मा. श्री उत्कर्ष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. त्यानंतर विद्यार्थी,उपस्थित पालक, व सर्व शिक्षकवृंद यांनी ‘जन-गण-मन’हे राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला सलामी दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नाटिकाव भाषणे सादर करून प्रजासत्ताक दिनाचे महत्व उलगडून सांगितले. संस्थेचे चेअरमन माननीय श्री उत्कर्ष पवार सर यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगत भारतीय संविधानाचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमास विद्यार्थीसह,शिक्षक, पालक व इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. शेवटी वंदे मातरम या गाण्याने व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *