संविधान मूल्यांचा जागर आणि गुणवंतांचा सन्मान — नूतन विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात
1 min read

संविधान मूल्यांचा जागर आणि गुणवंतांचा सन्मान — नूतन विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Loading

नूतन विद्यालयात प्रजासत्ताक दिन व वार्षिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण उत्साहात

शिंदखेडा प्रतिनिधी

नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धमाने तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल माळी यांच्या संयुक्त आयोजनातून प्रजासत्ताक दिन व वार्षिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायत संचलन, डंबेल्सचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
नूतन विद्यालय व विशाल माळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांतून देशप्रेम, शिस्त व कर्तव्यभावना प्रभावीपणे मांडली तसेच देशभक्तीपर गीते सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासाहेब आर. डी. पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री. व्ही. जी. पाटील, धमाने गावच्या सरपंच श्रीमती साखरबाई सोनवणे, उपसरपंच प्रमिलाबाई नथेसिंग गिरासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसो जिजाबराव सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य आबा मुंडे, माजी सैनिक प्रकाश महादू पाटील, पंचायत समिती सदस्य नानासाहेब दुल्लभ सखाराम सोनवणे, निळकंठ पुंडलिक पाटील, केशवराव नामदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संविधान मूल्ये, राष्ट्रभक्ती व जबाबदार नागरिकत्व यांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास धमाने व कुरुकवाडे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *