महात्मा फुले हायस्कूल येथे गुरु तेग बहादूरजी यांना अभिवादन !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे गुरु तेग बहादूरजी यांना अभिवादन !…
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शीख धर्माचे नववे गुरु तेग बहादुरजी यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एन कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते.
“हिंद की चादर ” गुरु तेग बहादुर यांच्या स्मृतिदिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान गटात प्रथम कृष्णा महाजन ७ वी , द्वितीय प्रेम पाटील ७ वी , तृतीय ज्योती बारेला ७ वी व मोठ्या गटात प्रथम वैभव माळी १०वी , द्वितीय जया सोनवणे ९ वी , तृतीय भावना बारेला ८ वी यांचा समावेश आहे या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. पी डी पाटील यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एच डी माळी तर आभार व्ही टी माळी यांनी मानले.

