आडगाव शाळेला तालुकास्तरीय मुल्यमापन अधिकारी समितीची भेट
1 min read

आडगाव शाळेला तालुकास्तरीय मुल्यमापन अधिकारी समितीची भेट

Loading

आडगाव शाळेला तालुकास्तरीय मुल्यमापन अधिकारी समितीची भेट

कासोदा ता एरंडोल : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र ३ नुसार केंद्रस्तरीय मुल्यमापानातून खाजगी अनुदानित शाळा गटातून प्रथम आलेल्या धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेला तालुकास्तरीय मुल्यमापन अधिकारी समितीचे गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन , तालुका पोषण आहार अधिक्षक जे डी पाटील, केंद्रप्रमुख बालू मोरे, हिमंत मोरे यांना शाळेचे मुल्यांकनासाठी शाळेतील भौतिक सुविधा, शासन निर्णय, शालेय उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता , शिष्यवृत्ती , आधार, अपार, शालेय व्यवस्थापन , आय सी टी लॅब, प्रयोगशाळा , परसबाग आदिं विविध बाबींचे प्रत्यक्षरित्या मुल्यमापन केले शाळेतील प्रशासना बाबतीत समितीने समाधान व्यक्त केले . यावेळी संस्थेचे कार्यध्यक्ष बी एस पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन व पोषण आहार अधिक्षक जे डी पाटील यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी केला केंद्रप्रमुख बालू मोरे व हिमंत मोरे यांचाही सत्कार करण्यात आला . यावेळी शाळेचे वरिष्ठ लिपीक भिवसन सातपूते अनिल देसले व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *