इंद्रायणी कोचिंग क्लासेस, चोपडा येथे भव्य पारितोषिक वितरण सोहळा  १०० पेक्षा अधिक पारितोषिकांचे दिमाखात वितरण; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
1 min read

इंद्रायणी कोचिंग क्लासेस, चोपडा येथे भव्य पारितोषिक वितरण सोहळा १०० पेक्षा अधिक पारितोषिकांचे दिमाखात वितरण; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Loading

इंद्रायणी कोचिंग क्लासेस, चोपडा येथे भव्य पारितोषिक वितरण सोहळा

१०० पेक्षा अधिक पारितोषिकांचे दिमाखात वितरण; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी
इंद्रायणी कोचिंग क्लासेस, चोपडा येथे रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी भव्य व प्रेरणादायी पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात एकाच वेळी १०० पेक्षा अधिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षा, सण-उत्सवांनिमित्त आयोजित स्पर्धा तसेच संपूर्ण वर्षभरातील अभ्यासक्रमात उज्ज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगीMTS Stars,Abacus – National Level Winners,
नवरात्रोत्सव अंतर्गत रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,गणेशोत्सव अंतर्गत नृत्य व श्लोक गायन स्पर्धा,तसेच संपूर्ण वर्ष अभ्यासक्रम पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन इंद्रायणी कोचिंग क्लासेसच्या संस्थापिका सौ. चंद्रिका कदम मॅडम (चोपडा, जि. जळगाव) यांनी केले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री महेश चौधरी (प्रताप आयटीआय विद्यालय, चोपडा), पंकज शाळेच्या उपशिक्षिका सौ. माधुरी पाटील, श्री हरिचंद्र कढरे (मा. मुख्याध्यापक) तर अध्यक्षस्थानी श्री गोकुळ पाटील (मा. केंद्रप्रमुख) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविक सौ. चंद्रिका कदम मॅडम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. चंद्रिका मॅडम व श्री हरिचंद्र कढरे यांनी करून दिला. यानंतर कढरे दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने कार्यक्रमाला प्रेरणादायी सुरुवात केली.
त्यांनी शायरीतून सांगितले –
“मिट्टी भिगोये बिना घडा नही बनता,
सोना तपे बिना कडा नही बनता,
कठीण मेहनत के बिना ‘अवार्ड’ नही मिलता.”

सौ. माधुरी पाटील मॅडम यांनी आपल्या भाषणात सौ. चंद्रिका मॅडम यांच्या अध्यापन पद्धतीचे कौतुक करत, आईसारखे प्रेम, मित्रासारखा संवाद आणि आवश्यक तेव्हा शिस्त यामुळे विद्यार्थी घडतात, असे सांगितले.
श्री महेश चौधरी सर यांनी क्लासमधून सुजान, सुसंस्कृत व गुणवंत विद्यार्थी घडत असल्याचे गौरवोद्गार काढले.

अध्यक्षीय भाषणात सेवानिवृत्त आदर्श केंद्रप्रमुख आबासो गोकुळ पाटील यांनी सौ. चंद्रिका मॅडम यांचे कार्य ज्ञानदानाचे पवित्र कार्य असल्याचे सांगत, क्लासमधून नॅशनल लेव्हलपर्यंत विद्यार्थी घडवण्याची किमया त्यांनी साध्य केल्याचे नमूद केले. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ७५ ते ८० टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
“विद्या दानं महा पुण्यम्” या उक्तीचा प्रत्यय मॅडम यांच्या कार्यातून येतो, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना यश, अपयश, सातत्य, जिद्द व सकारात्मक दृष्टिकोन यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भीतीवर मात करा, सातत्य ठेवा, अपयशातून शिका असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, थॉमस एडिसन यांच्या उदाहरणांद्वारे अपयश हेच यशाचे पहिले पाऊल असल्याचे पटवून देण्यात आले.
यानंतर प्रमुख पाहुणे व उपस्थित पालकांच्या हस्ते ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. भार्गवी चंद्रशेखर पाटील (इ. ७ वी) हिने अत्यंत जोशपूर्ण व प्रभावी भाषण करत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या भाषणाला उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती पाटील मॅडम, दिव्या सपकाळे मॅडम, प्रिया पाटील मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमात उत्कृष्ट टीमवर्क दिसून आले.
शेवटी सौ. चंद्रिका कदम मॅडम यांनी सर्व प्रमुख पाहुणे, पालकवर्ग, विद्यार्थी व उपस्थितांचे आभार मानले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा सोहळा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व यशाचा आनंद देणारा, तर पालकांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *