आरोग्य शिबिरास कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
![]()
Astemo India Pvt. Ltd. मध्ये मोफत होमिओपॅथीक आरोग्य शिबिरास कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
बांभोरी प्रतिनिधी):
Astemo India Private Limited, बांभोरी येथे दि. २० जानेवारी २०२६ रोजी चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व पी. ई. तात्या पाटील रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत होमिओपॅथीक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास कंपनीतील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या आरोग्य शिबिरात कर्मचाऱ्यांची सखोल व सर्वांगीण होमिओपॅथीक तपासणी करण्यात आली. शिबिरात विविध विभागांमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली.
सामान्य वैद्यकीय तपासणी (Medicine) विभागात डॉ. सुरेश अग्रवाल,
मधुमेह व सिकलसेल तपासणी (Diabetology & Sickle Cell) विभागात डॉ. नरेंद्र शर्मा,
स्त्रीरोग तपासणी (Gynecology) विभागात डॉ. अमिता श्रीवास्तव,
तर आपत्कालीन व सामान्य उपचार (Emergency & General Care) विभागात डॉ. स्वाती सोनवणे यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.
यासोबतच व्हायटल चेक-अप, ब्लड शुगर तपासणी, लसीकरण, औषध वितरण व नोंदणी या विभागांमार्फतही प्रभावी सेवा देण्यात आली. या सर्व कामकाजात सिस्टर सुनैना वाघ तसेच इंटर्न विद्यार्थी बिभीषण, फैजल, कांचन, वैशाली, रुतुजा, नविराह व निकिता यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी वाढती जागरूकता आणि शिबिरातील शिस्तबद्ध नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी ठरला. हा हेल्थ कॅम्प यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्री. नवल परदेशी यांचे नेहमीप्रमाणे विशेष सहकार्य लाभले.
तसेच Astemo India Private Limited कंपनीकडून श्री. मनोज देशपांडे (Plant Head), श्री. योगेश हेबलकर (HR Head), श्री. शशिकांत पाटील (HR & Admin) व डॉ. स्वाती सोनवणे (MO) यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
या आरोग्य शिबिराचे आयोजन हॉस्पिटलचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर तसेच प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे.


