प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व पदार्थ विज्ञान विभागात RUSA अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न -*
1 min read

प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व पदार्थ विज्ञान विभागात RUSA अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न -*

Loading

*प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व पदार्थ विज्ञान विभागात RUSA अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न -*
————————————–
प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रोनिक्स व पदार्थविज्ञान विभागात RUSA अंतर्गत आयोजित एक दिवसीय कार्यशाळा – “शोधूया स्वतःला, समजूया स्वतःला ” दि- 15 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्वतः चे मुल्यमापन करता यावे, गुणविशेषांची ओळ‌ख व्हावी व त्यांनी स्वतः मधील उर्जेला योग्य ती दिशा कशी द्यावी हा होता.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख व IQAC सम्नवयक डॉ. मुकेश भोळे यांनी भुषविले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आत्मपरिक्षणाचे महत्त्व सांगितले. या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून लाभलेले, प्रा. डॉ उल्हास सोनवणे व प्रा. खेमचंद पाटील ह्यांनी विद्यार्थ्यांना-विविध उपक्रमांद्वारे जीवनाला दिशा देण्यासाठी “Life balance sheet” च्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमास – पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ अमित पाटील, डॉ. एस.डी. बागुल, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. दिपाली सातपुते, प्रा. कल्याणी पाटील, प्रा. अमोल अहिरे, भगवान पाटील, पंकज भदाणे, मंगला पाडवी ह्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच डी जाधव यांनी पाठींबा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष विद्यार्थीनी माधुरी गुलाबराव पाटील तसेच आभार प्रदर्शन प्रीती विठ्ठल पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *