ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क येथे ब्रह्माबाबा अव्यक्त दिन श्रद्धेने साजरा
![]()
ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क येथे ब्रह्माबाबा अव्यक्त दिन श्रद्धेने साजरा
नांदेड प्रतिनिधी
आज रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्क येथे संस्थेचे संस्थापक पिताश्री ब्रह्मा बाबा अव्यक्त दिन अत्यंत भक्तीभावाने व आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी राजयोगीनी ब्रह्माकुमारीज अनिता दिदी, संचालिका – फरांदे पार्क यांनी अव्यक्त मुरली वाचन करून पिताश्री ब्रह्मा बाबांच्या महान कार्याचा, त्यागाचा व आध्यात्मिक वारशाचा सविस्तर उलगडा केला.
तसेच सुषमा बहन यांनी ब्रह्माबाबांचे १८ आध्यात्मिक कदम प्रभावीपणे स्पष्ट करत साधकांना जीवनात त्यांचे महत्त्व पटवून दिले.
कुमारी ऋतुजा बहन यांनी ब्रह्माबाबांच्या जीवनकहाणीचे सखोल विवेचन करत उपस्थितांमध्ये प्रेरणादायी संदेश दिला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ब्रह्माकुमारीज राजयोग मेडिटेशन सेंटर, फरांदे पार्क – नांदेड या मार्गदर्शक फलकांचे उद्घाटन बी.के. अनिता दिदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या आध्यात्मिक सोहळ्यास
डॉ. रामरावजी जाधव भाई, डॉ. आनंदराव मनुरकर भाईजी, उद्योजक राजेंद्र शंकरपुरे भाई, प्रा. निळकंठ जाधव भाई, वाखरडकर स्वामी भाई, पोलीस निरीक्षक मंडलावार भाई, सुधाकर कदम भाई, वटमवार भाई, रुपेश भाई, व्यंकटराव जाधव, डॉ. कल्पना जाधव माताजी यांच्यासह
सुषमा बहन, सरोजिनी बहन, शिवलीला बहन, सोनाली बहन, स्वामी माता, ऋतुजा बहन उपस्थित होत्या.
फरांदे पार्क व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रमात शांतता, आध्यात्मिक ऊर्जा व सकारात्मकतेचा अनुभव उपस्थितांना मिळाला.

