धैर्य, शिस्त आणि देशनिष्ठा : चार युवकांची ऐतिहासिक निवड
![]()
धैर्य, शिस्त आणि देशनिष्ठा : चार युवकांची ऐतिहासिक निवड
अमळनेर प्रतिनिधी :
कष्ट, चिकाटी, कठोर परिश्रम आणि देशसेवेची निष्ठा यांच्या बळावर परिसरातील चार होनहार युवकांनी भारतीय सुरक्षादलांमध्ये निवड होऊन आपल्या गावासह संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे. ही निवड केवळ त्यांची वैयक्तिक कामगिरी नसून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
चि. मनीष कुंभार (नगाव) – SSC GD मार्फत Assam Rifles मध्ये निवड
चि. विवेक रवींद्र पाटील (धुपी) – SSC GD मार्फत ITBP मध्ये निवड
🔹 चि. प्रशांत वाडीले (पातोंडा) – CRPF मध्ये जवान पदावर निवड
चि. करण पवार (पातोंडा) – BSF मध्ये जवान पदावर निवड
या चारही वीर सुपुत्रांचा गावकऱ्यांच्या वतीने बॅग, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत, देशसेवेत सदैव निष्ठेने कार्य करण्याचा संदेश दिला.
“तुमच्या निष्ठावंत सेवेमुळे देश सुरक्षित आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या सत्कार समारंभास जवानांचे आई-वडील, कुटुंबीय, ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री कपिल पवार सर व विलास सर यांची उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन जि. प. अमळगाव पातोंडा गटातील भावी उमेदवार सौ. रिताताई भूपेंद्र बाविस्कर यांनी केले होते. यावेळी गावातील मान्यवर सौ. वैशाली पवार, श्री नितीन पारधी, श्री अशोक पवार, श्री भरत बिरारी, श्री सोपान लोहार, श्री सुनील पवार, श्री प्रशांत पवार, श्री अमित पवार सर, श्री रमेश संदांशिव, श्री संजय पवार, श्री अनिल पवार, सौ. छाया वाडीले, सौ. मंगला भोई, सौ. आशा भोई तसेच चि. करण पवार व त्यांचे वडील श्री अनिल पवार, श्री प्रशांत वाडीले व त्यांची आई सौ. संगीता राजेंद्र वाडीले आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पातोंडा परिसर विकास मंचातील सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या गौरव सोहळ्यास उपस्थित राहिले.
या चारही जवानांच्या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणांमध्ये देशसेवेची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.


