नामदार जयकुमार भाऊरावल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुरुकवाडे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
![]()
नामदार जयकुमार भाऊरावल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुरुकवाडे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
कुरुकवाडे | शिंदखेडा तालुका | धुळे जिल्हा
महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊरावल साहेब यांचा वाढदिवस दि. १६ जानेवारी रोजी असून, त्या निमित्ताने दि. १५ जानेवारी २०२६ रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे आरोग्य शिबिर छोट्या खाटू नगरीत, खाटू श्याम बाबा मंदिराच्या प्रांगणात पार पडले. या शिबिराचे आयोजक विशाल माळी हे होते. त्यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थ, रुग्ण मित्र व श्याम बाबा परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या आरोग्य शिबिराचा ग्रामस्थांनी लाभ घेतला.
शिबिरात उपकेंद्र कुरुकवाडे येथील
श्रीमती. बी. सी. वाडीले (आरोग्य सेविका),
श्री. T. Pawar (आरोग्य सेवक)
यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले. तसेच आशा वर्कर कंचन ताई यांनी तपासणी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. रक्तदाब, मधुमेह तसेच सामान्य आजारांची तपासणी करण्यात आली.
या उपक्रमासाठी श्याम बाबा परिवार, रुग्ण मित्र व ग्रामस्थ मंडळी यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण शिबिर शांततेत, शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले.
या सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आयोजक विशाल माळी यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
“विशाल माळी हे सातत्याने सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवतात. लोकांना चांगल्या प्रकारच्या सेवा देण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

