व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन बनला एक अविस्मरणीय “शिव सोहळा”…* *”शिवगाथा”- राजा शिवछत्रपती यांच्या जीवनकार्यास विनम्र अभिवादन*
![]()
*व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन बनला एक अविस्मरणीय “शिव सोहळा”…*
*”शिवगाथा”- राजा शिवछत्रपती यांच्या जीवनकार्यास विनम्र अभिवादन*
दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन 2025-26 हा दि. 9/1/2026, शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, अमळनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.हा स्नेहसंमेलन “शिवगाथा”- राजा शिवछत्रपती यास विनम्र अभिवादन या मुख्य विषयावर आधारित होता. त्यासंबधी विविध कलाविष्कार या वार्षिक स्नेहसंमेलनात सादर करण्यात आले. आपल्या आकर्षक प्रस्तुती करणासाठी प्रसिद्ध या महोत्सवाने सर्व उपस्थितांची मने जिंकून घेतली
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.दत्तात्रय निकम (पोलीस इन्स्पेक्टर,अंमळनेर) मा. सौ. मंदाकिनी भामरे( तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस अमळनेर, सरपंच लोन, तालुका अमळनेर) मा. सौ भारती शिंदे (प्रतिनिधी,लोकमत सखी मंच) तसेच संस्थेचे चेअरमन मा.श्री उत्कर्ष पवार, उपाध्यक्ष मा. श्री.उमाकांत पाटील तसेच संस्थेच्या सचिव सौ.अलका पवार यांच्या उपस्थितीने स्नेहसंमेलनाची शोभा वाढवली. सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षा सोहिते यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर प्रमुख पाहुणे मा.श्री. दत्तात्रय निकम यांनी शाळेबद्दल आपले सुंदर मनोगत व्यक्त केले, मा. सौ मंदाकिनी भामरे यांनी शाळेबद्दल आपले प्रेम तसेच संपूर्ण शाळेचे भरभरून कौतुक केले. त्यासाठी शाळा ही त्यांची नेहमीच आभारी राहील.
दरम्यान या सर्व औपचारिक कार्यक्रमानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. “शिवगाथा”या विषयावर आधारित हे स्नेहसंमेलन होते ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा प्रवास सादर करण्यात आला.’आई जगदंबे’…… या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘महाराष्ट्र सुखाने नांदत… ‘शिवनेरीवर सिंह जन्मला’…, ‘झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा’…… शिवबाचं मावळे…….,’स्वराज्य शपथ’,..’अफजल खान’….’बाजीप्रभू’… ‘शिवबाचे मावळे’, ‘तानाजी मॅशप’ ‘रायगड भक्कम झाला” हिरकणी’ ‘राज्याभिषेक’…… इ.असे अनेक भावनाक्षोभ करणारे आनंदपर्यवसायी नाटक व गीत यांचा आकर्षक संगम यात पाहण्यात मिळाला. पूर्व प्राथमिकच्या बालकलाकारापासून ते प्राथमिक वर्गातील विद्यार्थी अशा सर्वच विद्यार्थ्यांनी हुबेहूब व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या या बहारदार नृत्य आणि व गाण्याने सर्वांनाच माना डोलवायला लावल्या. या सर्व प्रकारातून स्नेहसंमेलनाची मजा उत्तरोत्तर वाढतच गेली.
दरम्यान सभागृहात “छत्रपती शिवाजी महाराज की जय..!” “जय भवानी जय शिवाजी!” अशा घोषणा देखील केल्या जात होत्या.शेवटी राज्याभिषेक प्रसंगी घोड्यावर बसून शिवाजी महाराजांचे स्वागत करण्यात आले. अशा प्रकारे शिवाजी महाराजांविषयी एक सर्वंकष अविष्कारकृती या वार्षिक स्नेहसंमेलनात करण्यात आली होती. आपल्या पाल्यांचा हा कलाविष्कार पाहून पालकांच्याही चेहऱ्यावर एक अविस्मरणीय आनंद उमटला होता.
या वार्षिक स्नेहसंमेलनातच्या आयोजन व नियोजन संस्थेच्या सचिव सौ. अलका पवार व मुख्याध्यापिका सौ. वर्षा सोहिते यांनी केले होते.त्यांना संस्थेचे चेअरमन मा.सौ उत्कर्ष पवार यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व कार्यक्रमाचे श्रेय हे प्रत्यक्षात मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांमागे अविरत मेहनत घेणारे,त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शाळेतील शिक्षक मा. श्री. दिनेश शेलकर यांना जाते. तसेच शाळेतील सर्व शिक्षिका यांनी देखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी अचूक मार्गदर्शन केले, विविध नृत्य बसवण्यास मेहनत घेतली होती. नृत्यशिक्षिका देवायानी ठाकूर व जानवी बोरसे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम नृत्य शिकवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मनीषा सोनार व योगिता फालके यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संस्थेच्या सचिव अलका पवार यांनी केले या स्नेहसंमेलनाच्या यशस्वी संपन्नतेसाठी शाळेतील सर्व माननीय सदस्य, सर्व शिक्षिका कविता पाटील, प्रतिक्षा पाटील,संगीता पाटील,रोशनी महाजन, मनीषा ठाकूर,नीतू शेलकर,प्रियंका चौधरी, जया परदेसी, चारूलता तायडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाग्यश्री पाटील व सविता चौधरी या सर्वांचे अमूल्य सहकार्य लाभले.




