सरपंच परिषद मुंबईचा जामनेर मेळावा; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण , सरपंच परिषद मुंबईच्या मेळाव्यात समृद्ध पंचायतराज अभियानावर सखोल मार्गदर्शन
![]()
सरपंच परिषद मुंबईचा जामनेर मेळावा; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण
सरपंच परिषद मुंबईच्या मेळाव्यात समृद्ध पंचायतराज अभियानावर सखोल मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जामनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान सरपंच परिषद मुंबईचे प्रदेशाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ काकडे यांनी भूषविले.
या मेळाव्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या महत्त्वाकांक्षी उपक्रमाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामविकासासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे कशा राबवाव्यात, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ग्रामस्तरावर सरपंच व पदाधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, प्रशासनाशी समन्वय, निधी व्यवस्थापन, विकासकामांची अंमलबजावणी यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करताना उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
मेळाव्याच्या निमित्ताने सरपंच परिषदेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ काकडे तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सौ. सुषमाताई देसले पाटील यांच्या शुभहस्ते अधिकृत नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मा. श्री. टेमगिरे साहेब, मा. श्री. राजमल भागवत, श्री. बाळूभाऊ धुमाळ, श्री. युवराज पाटील, श्री. जितू माळी, सौ. निताताई पाटील, सौ. सुनीताताई तायडे, सौ. कल्याणी पाटील, सौ. शितल पाटील यांच्यासह सरपंच परिषद मुंबईचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील अनेक सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा मेळावा ग्रामविकासाला गती देणारा, सरपंच व पदाधिकाऱ्यांना नवी दिशा देणारा ठरला असून, आगामी काळात गावागावात समृद्धी पोहोचविण्यासाठी अशा मार्गदर्शनात्मक मेळाव्यांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




