मोठा माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक !….  ४३ व्या सत्यशोधक समाज संघाच्या अधिवेशनाचे साक्षीदार होणार – व्ही टी माळी सर ( समाजाध्यक्ष )
1 min read

मोठा माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक !…. ४३ व्या सत्यशोधक समाज संघाच्या अधिवेशनाचे साक्षीदार होणार – व्ही टी माळी सर ( समाजाध्यक्ष )

Loading

मोठा माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक !….

४३ व्या सत्यशोधक समाज संघाच्या अधिवेशनाचे साक्षीदार होणार – व्ही टी माळी सर ( समाजाध्यक्ष )

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव : शहरातील मोठा माळीवाडा समाज मढीमध्ये सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक सचिव आर डी महाजन यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाध्यक्ष व्ही टी माळी होते. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सत्यशोधक समाज संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या ४३ व्या राज्य अधिवेशनबाबत विस्तृत माहिती दिली. अंधश्रद्धा, कर्मकांडाला दुर सारू या व आपल्या परिसरात सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश, दशपिंड विधी, साक्षगंध सोहळा करूया. यानंतर सत्यशोधक दिनदर्शिका संदर्भात विस्तृत माहिती दिली आणि अधिवेशनासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
माळी समाजाध्यक्ष व्ही टी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या अधिवेशनासाठी मोठा माळीवाडा परिसरातून जास्तीत जास्त कार्यकर्ते येतील आणि सर्वोतपरी सहयोग करू. यांसह जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी अधिवेशनाला येण्याचे आवाहन देखील केले. याप्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष सोमनाथ महाजन, माजी अध्यक्ष विठोबा महाजन, माजी उपाध्यक्ष निंबाजी महाजन, विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, कैलास माळी, दशरथ महाजन, सुखदेव महाजन, डिगंबर महाजन, रावा माळी, गोपाल महाजन, गणेश महाजन, तुळशीराम महाजन, एच डी माळी, दिनेश महाजन, जिभाऊ महाजन, कैलास महाजन, यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव आर डी महाजन यांनी तर आभार सहसचिव विनायक महाजन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *