ए.टी. झांबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धा
![]()
ए.टी. झांबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धा
जळगाव: ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील विविध प्रसंग सादर केले.
या स्पर्धेत अनुश्री चौधरी हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. मानवी पाटील हिने द्वितीय, तर स्वरा कुलकर्णी हिने तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय, भैरवनाथ गर्दे याला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे व पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. परीक्षक म्हणून ज्येष्ठ शिक्षक निर्मल चतुर व एकनाथ पाचपांडे यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन रत्नमाला शिंदे मॅडम यांनी केले.

