राष्ट्रविकास संस्थेमार्फत डीआरओ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २४ पाणलोट गावांसाठी ८ प्रशिक्षण बॅच यशस्वी
1 min read

राष्ट्रविकास संस्थेमार्फत डीआरओ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २४ पाणलोट गावांसाठी ८ प्रशिक्षण बॅच यशस्वी

Loading

राष्ट्रविकास संस्थेमार्फत डीआरओ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २४ पाणलोट गावांसाठी ८ प्रशिक्षण बॅच यशस्वी

अमळनेर प्रतिनिधी
न्यू जनरेशन पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकूण २४ पाणलोट गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी क्षमता बांधणी घटकांतर्गत आठ प्रशिक्षण बॅच यशस्वीरीत्या पार पडल्या.
या प्रकल्पांत अमळनेर तालुक्यातील ९, पारोळा तालुक्यातील ९ व पाचोरा तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे. जिल्हा संसाधन संस्था (डीआरओ) अंतर्गत प्रशिक्षण संस्था म्हणून राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था, अमळनेर (जि. जळगाव) यांची निवड करण्यात आली होती.
वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे व जलसंधारण विभाग, जळगाव यांच्या सहकार्याने सदर प्रशिक्षण घेण्यात आले. जल व भूमी व्यवस्थापन संस्था, छत्रपती संभाजीनगर यांनी तयार केलेल्या प्रविण प्रशिक्षकांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात सरपंच, सचिव, ग्रामसेवक, पाणलोट पथक सदस्य, शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी, पीआयए, जिल्हा लेखापाल यांचा सहभाग होता.
प्रशिक्षणात पाणलोट क्षेत्र ओळख, सविस्तर प्रकल्प आराखडा, लेखा बाबी, बहिर्गमन प्रक्रिया, पाणी नियोजन, पीक पद्धती, शेतकरी उत्पादक संघ, एनजीओ मॅनेजमेंट व शासकीय योजनांचे कन्वर्जन अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक मा. श्री. बी. एस. ढंगारे, जिल्हा समन्वयक श्री. पुरुषोत्तम पाटील तसेच अमळनेर, पाचोरा व पारोळा येथील पाणलोट पथकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भूपेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे सचिव तुषार पाटील, मास्टर ट्रेनर अशोक पाटील यांच्यासह सर्व प्रशिक्षक व प्रतिनिधींनी उत्कृष्ट नियोजन केले.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण किट व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *