खान्देश साहित्य संघ’ च्या अमळनेर ‘तालुकाध्यक्ष’पदी सुनीता पाटील, ‘तालुका सचिव’पदी गोपाल हडपे
1 min read

खान्देश साहित्य संघ’ च्या अमळनेर ‘तालुकाध्यक्ष’पदी सुनीता पाटील, ‘तालुका सचिव’पदी गोपाल हडपे

Loading

‘खान्देश साहित्य संघ’ च्या अमळनेर ‘तालुकाध्यक्ष’पदी सुनीता पाटील, ‘तालुका सचिव’पदी गोपाल हडपे

अमळनेर प्रतिनिधी – खान्देश साहित्य संघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी कवियत्री तथा जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ. सुनीता रत्नाकर पाटील तर तालुका सचिव पदी माध्यमिक शिक्षक गोपाल पोपट हडपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खान्देश साहित्य संघाचे केंद्रिय अध्यक्ष प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी, जळगाव जिल्हाध्यक्ष शरद धनगर, जिल्हा सचिव उमेश काटे यांच्या स्वाक्षरीने या नूतन पदाधिकाऱ्यांची तीन वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.
खान्देश साहित्य संघाची उर्वरित अमळनेर तालुका कार्यकारीणी पुढील प्रमाणे
कार्याध्यक्ष- दत्तात्रय बारकु सोनवणे, उपाध्यक्ष शरद भिका पाटील, उपाध्यक्ष -प्रतिभा रामचंद्र पाटील, सहसचिव- रूपाली अरुण पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक- गोरख दगडू पाटील, राजेंद्र भिकन वाघ, कार्यवाह- नूतन हिंमत पाटील, कार्यवाह-अशोक रघुनाथ पाटील, ज्येष्ठ महिला मार्गदर्शक- छाया अशोक इसे, अनिता दिपक बोरसे, महिला संघटक- रेखा वाल्मिक मराठे, भारती यशवंत शिंदे, पुरुष संघटक- चंद्रकांत भिला पाटील,विशाल सोपानराव देशमुख तर सदस्य पदी पुनम जगतराव साळुंखे, जयश्री दिलीप पवार, मंगल विठ्ठल नागरे, रविंद्र सुकदेव पाटील, अनिल नथ्थु पाटील, विलास गोविंदा बिरारी, मनोज चिंतामण ठाकरे यांचा समावेश आहे. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल मराठी वाङमय मंडळ, पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय व ग्रंथालय, शिवशाही फाउंडेशन, साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच,’मसाप’ अमळनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *