अमळनेर येथील आर्मी स्कुलला राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकाची भेट
1 min read

अमळनेर येथील आर्मी स्कुलला राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकाची भेट

Loading

अमळनेर येथील आर्मी स्कुलला राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकाची भेट

अमळनेर – राज्यातील सैनिकी शाळांचे सुधारित धोरण शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले आहे. या सुधारित धोरणात आवश्यक बदल करण्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्यूनिअर कॉलेज ला “राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकाने भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र विभागीय मंडळाचे सहसंचालक अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय उपसंचालक कार्यालयाचे सहाय्यक संचालक रवींद्र वाणी, समिती सदस्य विनायक वाघ, गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, विषयतज्ञ प्रमोद पाटील, महेंद्र पाटील यांचा या विशेष पथकात समावेश होता. सुरुवातीला आर्मी स्कुलच्या छोट्या जवानांनी पथसंचालनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी पथकाला शाळेच्या प्रगती बाबत माहिती दिली. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, प्रा.शाम पवार, प्रशांत गावंडे, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, प्राचार्य बी डी पाटील, पी.एम. कोळी, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील, सुभेदार अनिल पाटील आदी उपस्थित होते.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी लष्करी प्रात्यक्षिके करून दाखवलीत. त्यानंतर पथकाने वसतिगृहातील डॉक्टर कक्ष, स्वच्छतागृह तसेच मेस विभागाची पाहणी करून मेस मध्ये भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी शालेय इमारतीतील, मुख्य कार्यालय कक्ष, ग्रंथालय कक्ष, संगणक कक्ष, फिजिक्स लॅब, केमिस्ट्री लॅब, बायोलॉजी लॅब, इंग्लिश लैंग्वेज लॅब ची पाहणी केली.

शालेय प्रगतीबाबत व्यक्त केले समाधान!

राज्यस्तरीय समिती पथकाने शाळेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी अनिल साबळे व रवींद्र वाणी यांनी शालेय प्रगती बाबत समाधान व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या लष्करी प्रशिक्षण चे कौतुक करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला अधिक गती देण्यासाठी शिक्षकांनी अधिक मेहनत घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. संगणक शिक्षक व्ही डी पाटील यांनी सैनिकी शाळेतील शिक्षकांना ‘एनडीए’ बाबत वर्षातून किमान एकदा विशेष प्रशिक्षण व कार्यशाळा देण्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. उमेश काटे व एस ए बाविस्कर यांनी सैनिकी शाळेतील प्रवेश पूर्व परीक्षेत सुधारणा करून नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर प्रवेश पूर्व परीक्षा घेण्याबाबत सुचविले. या दोन्ही मागणीची पथकाने नोंद घेत शासनाकडे याबाबत अहवाल देणार असल्याचे संकेत दिले. प्रा.सुनील गरुड यांनी प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य बी.डी पाटील यांनी आभार मानले.
——
अमळनेर – राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकातील अधिकारी अनिल साबळे, रवींद्र वाणी यांच्या समवेत माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, विनायक वाघ, प्रमोद पाटील आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *