सावित्रीबाई फुले विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य पी.एम .कोळी यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रमुख अतिथी म्हणून अनिल पाटील उपस्थित होते. प्रमुख वक्ते गोपाल हडपे यांनी साने गुरुजींचा श्यामची आई या पुस्तकाचा दाखला देत साने गुरुजींचा पूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला. प्रमुख अतिथी अनिल पाटील, व कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.एम. कोळी यांचेही भाषण झालीत . शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे आंतरवासिता प्रशिक्षणार्थी वेदांत चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन अश्विनी चौधरी यांनी केले.

