खानदेश गौरव कै.रुक्मिणीताई यांची जयंती साजरी
1 min read

खानदेश गौरव कै.रुक्मिणीताई यांची जयंती साजरी

Loading

खानदेश गौरव कै.रुक्मिणीताई यांची जयंती साजरी

अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये खानदेश गौरव कै. रुक्मिणीताई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम .कोळी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जु. विभागाचे प्रमुख एस. एस. साळुंखे, सुरेश पाटील, अनिल पाटील उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी रुक्मिणी ताई यांच्या जीवनाविषयी सुनील वाघ यांनी आपल्या भाषणातून ताईंच्या जीवनावर प्रकाश ज्योत टाकला. तसेच आचार्य पी.एम कोळी यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. नवल भाऊ यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी माहिती सांगितली. तसेच आदरणीय संस्थाअध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील यांच्या मातोश्री खान्देश गौरव कै. रुक्मिणीताई यांचा जीवनपट सांगितला. जूनियर विभागाचे आर. आर. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *