खान्देश गौरव कै. रुख्मिणीताई स्मृतिचषक बौद्धिक व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न   रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे पाच माध्यमिक शाळांना क्रीडा साहित्य वाटप
1 min read

खान्देश गौरव कै. रुख्मिणीताई स्मृतिचषक बौद्धिक व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे पाच माध्यमिक शाळांना क्रीडा साहित्य वाटप

Loading

खान्देश गौरव कै. रुख्मिणीताई स्मृतिचषक बौद्धिक व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे पाच माध्यमिक शाळांना क्रीडा साहित्य वाटप

 

अमळनेर प्रतिनिधी— विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासही संतुलितपणे व्हावा, या उद्देशाने रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे पाच माध्यमिक शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्था मार्गदर्शिका शिलाताई पाटील व कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.
खान्देश गौरव कै. रुख्मिणीताई स्मृतिचषक बौद्धिक व क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने फापोरे बु. (ता. अमळनेर) येथील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंतरशालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड होते. ग्रामविकास संस्था सुवर्ण समितीचे अध्यक्ष डी. के. पवार, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, प्रा. शाम पवार, प्रशांत गावंडे, तालुका फ्रूट सेल सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. पाटील, फापोरे येथील सरपंच कविता पाटील, पोलीस पाटील अश्विनी पाटील यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उमेश काटे यांनी क्रांतिवीर स्व. नवलभाऊ व खान्देश गौरव स्व. रुख्मिणीताई यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती दिली. प्रा. सुनील गरुड, प्रा. शाम पवार व डी. के. पवार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दहावीची विद्यार्थिनी जानवी पाटील हिच्या प्रभावी वक्तृत्वासाठी तिला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे ताडे (ता. एरंडोल), सडावण (ता. अमळनेर), इगतपुरी, वेले (ता. चोपडा) व फापोरे येथील पाचही शाळांना क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले. तसेच शालेय परिसरात भौतिक सुविधा उपलब्ध करून देणारे दानशूर शिक्षक एस. एन. पाटील, संजय बागल व उल्हास पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. एस. शंखपाळ यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक वाय. आर. पाटील यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश्वर बोरसे, शीतल काटे, समाधान पारधी, प्रशांत पाटील, हंसराज पाटील, नंदा पाटील, युवराज पाटील, त्रिपाल पाटील व प्रकाश गायकवाड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *