प्रमोद पाटील चिलाणेकर यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहिर
![]()
प्रमोद पाटील चिलाणेकर यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहिर
कासोदा ता एरंडोल : येथील प्रमोद पाटील चिलाणेकर यांची सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य व सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र समुह आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या हिन्दी मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणार महत्वाचा दर्पण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे . पत्रकार दिनाच्या दिवशी मोठ्या सन्मानाने पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी दै लोकमत वृत्तपत्र च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत गरजा वार्डनिहाय क्रमशः लेखन करून जनतेसमोर व शासनदरबारी परखडपणे संशोधनात्मक पद्धतीने मांडणी केली होती . याची मुख्यतः दखल घेऊन त्यांना दर्पण रत्न पुरस्कार २०२६जाहिर करण्यात आला आहे . प्रमोद पाटील चिलाणेकर यांचे शैक्षणिक कार्य हे ग्रामीण भागातील विद्यार्थांची गुणवत्ता वाढ, सामाजिक सलोखा , भष्ट्राचार निर्मुलन, अंधश्रध्दा निर्मुलन तसेच काव्य व साहित्य लेखन, सहकार क्षेत्रातील विविध संस्थामधे नियोजनात्मक कार्य, आदि सर्व बाबींची दखल घेण्यात आली आहे . यापुर्वी ही गांधी रिसर्च नेपाळ देशाने त्यांच्या ग्रामीण भागातील जनतेच्या वार्डनिहाय समस्यांचे संशोधनात्मक लेखनाची दखल घेऊन मानद डिलिट पदवी देऊन गौरव करण्यात आला होता . त्यांचे कार्य गावस्तरावरून ते जिल्हास्तरापर्यन्त कार्य चालू असते . पत्रकार क्षेत्रा पलिकडे विविध क्षेत्राशी निगडीत असल्याने दर्पण वृत समूहाने दखल घेतली आहे . चिलाणेकर हे पत्रकार क्षेत्रात उच्चशिक्षित असुन नामांकित संस्थेवर प्रधानआचार्य म्हणून यशस्वी काम पाहत आहे . त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे .

