जळगावला ४ जानेवारीला प्रथमच येणार १२० बौद्ध भिक्खुनी , अजिंठा हौसिंग सोसायटी मध्ये होणार धममदेसना
1 min read

जळगावला ४ जानेवारीला प्रथमच येणार १२० बौद्ध भिक्खुनी , अजिंठा हौसिंग सोसायटी मध्ये होणार धममदेसना

Loading

जळगावला ४ जानेवारीला प्रथमच येणार १२० बौद्ध भिक्खुनी , अजिंठा हौसिंग सोसायटी मध्ये होणार धममदेसना
______________________________________
जळगाव :- बुद्ध चतु परिसा भिक्खूनी संघ , थायलंड द्वारा भारतात महिलांमध्ये बौद्ध परंपरा विषयी प्रबोधन करणे , अधिकाधिक महिलांना भिक्खूनी बनविणे , भिक्खूनी निवासकेंद्रं उभारणे अश्या विविध उपक्रमास गतिमान करण्या करिता सातत्याने प्रयत्न केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी थायलंड येथील भिक्खूनी विसुती याना यांच्या नेतृत्वाखाली १२० बौद्ध भिक्खुनी जळगाव येथे येत आहेत . अशी माहिती जळगाव येथील भिक्खूनी अय्या वेदिसा यांनी दिली .
अजिंठा हौसिंग सोसायटी येथील जेतवन बुद्ध विहारात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या .
या बैठकीत अधिक माहिती संघमित्रा चव्हाण यांनी देतांना सांगितले की थायलंड येथील ९ भिक्खूनी त्यांच्या भारतीय सहकारीनिंसह जळगाव येथे येणार आहेत . त्या सर्वप्रथम अजिंठा सोसायटीत चारिका करणार व त्यानंतर उपस्थित जनतेस धम्मदेसना देतील .
कार्यक्रमाची आखणी उपासक चेतन नन्नवरे यांनी मांडली व या समारंभात जळगाव शहरातील बौद्ध महिलांना अधिक संख्येने सहभागी करून घेण्या करिता करावयाच्या कामांची माहिती सांगितली .
जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी सांगितले की, येवढ्या मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खूनी जळगाव शहरात येणे ही एक ऐतिहासिक बाब आहे . बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ स्वतंत्र भिक्खूनी संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करीत आहे ही महिलांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने गौरवास्पद आहे .
कार्यक्रमाच्या नियोजना करिता ॲड. आनंद कोचुरे , दिलिप सपकाळे , प्रियंका सपकाळे , गीता सोनवणे , ज्योती भालेराव यांनी विविध प्रकारच्या सूचना करून मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश सैंदाणे, प्रास्ताविक नूतन तासाखेडकर , परिचय कविता सपकाळे यांनी तर आभारप्रदर्शन हर्षल सुरडकर यांनी केले .
बैठकीस प्रवीण नन्नवरे , दिलिप तासखेडकर, सतीश सोनवणे , विजय भालेराव , विजय सैंदाणे, रामकृष्ण सावळे , वर्षा कोचुरे , आशा सपकाळे , सुनंदा सैंदाणे, सुमन बैसाने , विमल भालेराव , पूजा कोचुरे , रंजनी सैंदाणे आदींसह स्त्री , पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *