महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
![]()
महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी :
संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता, समाजप्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या कार्याला या निमित्ताने उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून पुष्पहार अर्पण केला. आपल्या मनोगतात त्यांनी संत गाडगेबाबा यांनी समाजाला दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले.
यावेळी शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, गुरूदास पाटील, उपस्थित होते. उपस्थितांनी संत गाडगेबाबा यांच्या समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वच्छतेचे महत्त्व व समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण झाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


