माघारीनंतर खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट  खानदेश शिक्षण मंडळ निवडणूक : सत्तासंघर्ष की गुणवत्तेची लढाई?
1 min read

माघारीनंतर खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट खानदेश शिक्षण मंडळ निवडणूक : सत्तासंघर्ष की गुणवत्तेची लढाई?

Loading

माघारीनंतर खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट

खानदेश शिक्षण मंडळ निवडणूक : सत्तासंघर्ष की गुणवत्तेची लढाई?

अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन)
खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या त्रैवार्षिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने शनिवार दि. 20 डिसेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. माघारीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त तसेच कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी अंतिम उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली असून निवडणूक प्रक्रियेला अधिकृत गती प्राप्त झाली आहे. अध्यक्ष पदासाठी विनोद जगदीश अग्रवाल, डॉ. रविंद्र काशिनाथ कुळकर्णी, विक्रम बिपीनचंद शाह, विजय जगन्नाथ बोरसे, लालचंद हेमनदास सैनानी, राकेश गिरधरलाल माहेश्वरी व अक्षय नंदकिशार अग्रवाल हे सात उमेदवार निवडणूक रिंगणात असून उपाध्यक्ष पदासाठी सचिन बुधा पाटील, कमल आसकरण कोचर व माधुरी प्रमोद पाटील हे तीन उमेदवार निवडणूक लढवित आहेत. विश्वस्त पदासाठी वसुंधरा दशरथ लांडगे व पुरुषोत्तम वसंत शेटे हे दोन उमेदवार अंतिम यादीत आहेत.

कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी एकूण १७ उमेदवार अंतिम यादीत असून या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. कार्यकारी मंडळासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये निशांत राजेंद्र अग्रवाल, योगेश मधुसुदन मुंदडे, पंकज गोविंद मुंदडे, कल्याण साहेबराव पाटील, हरी भिका वाणी, जितेंद्र मोहनलाल जैन, डॉ. अनिल नथ्थु शिंदे, प्रदीप कुंदनलाल अग्रवाल, निरज दिपचंद अग्रवाल, डॉ. संदेश बिपीन गुजराथी, प्रसाद रमेशचंद शर्मा, प्रविण रामलाल जैन, लिना प्रविण पाटील, संतोष बाबुराव पाटील, दिलीप हरकचंद जैन, डॉ. अविनाश रघुराज जोशी व जितेंद्र शांतीलाल झाबक यांचा समावेश आहे. माघारीनंतर अंतिम उमेदवारांना अर्ज माघारीच्या क्रमांकानुसार निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असून अंतिम उमेदवारी यादी व उमेदवारांच्या चिन्हांची माहिती संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.

ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक उपसमितीचे चेअरमन श्री. पंडित रामचंद्र चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असून समिती सदस्य श्री. विवेकानंद लक्ष्मण भांडारकर, श्री. मनोहर भगवान महाजन, प्रा. डॉ. सुनील लिंबाजी गरूड तसेच खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस प्रा. पराग पी. पाटील, राकेश निळे व भटू चौधरी हे निवडणूक कामकाजात सक्रिय सहकार्य करीत आहेत. माघारीनंतर अंतिम उमेदवारी जाहीर झाल्याने आता सर्वच पदांसाठी प्रचाराला वेग येणार असून खानदेश शिक्षण मंडळाच्या या महत्त्वपूर्ण निवडणुकीकडे शिक्षणप्रेमी व संस्थेच्या सभासदांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
खानदेश शिक्षण मंडळाची ही निवडणूक यंदा अत्यंत प्रतिष्ठेची व लक्षवेधी ठरत असून दोन प्रमुख पॅनल्ससह काही अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ पदांसाठी मर्यादित न राहता प्रभाव, वर्चस्व व भविष्यातील धोरणांवर परिणाम करणारी ठरण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात असून यामुळेही चर्चांना उधाण आले आहे. सध्या खानदेश शिक्षण मंडळात भरती प्रक्रियेवरून निर्माण झालेले वादंग, शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न, व्यवस्थापनातील पारदर्शकता व शिस्त अशा अनेक ज्वलंत मुद्द्यांवर सभासदांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने निवडून येणारे पॅनल खरोखरच शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ठोस व सकारात्मक निर्णय घेणार का, की जुन्याच वादांना खतपाणी घातले जाणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणत्या पॅनलवर सभासद विश्वास टाकतात, गुणवत्ता, पारदर्शकता व विकासाला कोण पसंती देतात, हे येणारा काळ ठरवेल; हेच या निवडणुकीचे निर्विवाद सत्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *