“विकसित भारत” संकल्पनेचा जागर; सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
1 min read

“विकसित भारत” संकल्पनेचा जागर; सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

Loading

विकसित भारत” संकल्पनेचा जागर; सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

 

मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क

अमळनेर प्रतिनिधी(-शरद पाटील सर)

शिक्षण विभाग पंचायत समिती अंमळनेर व सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मंगरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बोहरा स्कूल मध्ये आयोजित करण्यात आले होते
विकसित भारत” संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक सर्जनशीलतेचे दर्शन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती व नवोदित विचारांना चालना देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन यांच्या अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील साहेब शुभहस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थान श्री. संजय पाटील सर यांनी भूषविले. तसेच याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी सौ. रागिनी चव्हाण मॅडम ,सौ अप्रतिम सानप मॅडम बोहरा स्कूलचे चेअरमन श्री सुरेंद्र बोहरा सर , बोहरा स्कूल ची प्राचार्य श्री जितेंद्र सिंह सर ,तालुका अध्यक्ष विज्ञान मंडळाचे श्री निरंजन पेंढारे सर ,गणित मंडळाचे अध्यक्ष डी.एन.धनगर सर, विज्ञान मंडळाचे कार्याध्यक्ष डी के पाटील सर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात ‘विकसित भारत’ या ध्येयपूर्तीसाठी विज्ञान, तंत्रज्ञान व विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला योग्य व्यासपीठ मिळाल्यास देशाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नवीन व नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल भारत, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, आरोग्य व कृषी तंत्रज्ञान या विषयांवर आधारित प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल्स, तक्ते व प्रयोग अत्यंत सुबोध व समाजोपयोगी ठरले.
प्रदर्शनाला विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच विज्ञानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. परीक्षकांनी प्रकल्पांची सखोल तपासणी करून वैज्ञानिक मांडणी, उपयुक्तता व नाविन्य या निकषांवर गुणांकन केले.

गितेश विकास निकम साने गुरुजी या विद्यार्थ्यास प्रथम, तर समीक्षा अभय बिराडे, डी. आर. कन्या हायस्कूल हिला दुसऱ्या क्रमांकाची, जयेश निंबा पाटील लोंढवे हायस्कूल अमळनेर याच तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस उच्च प्राथमिक गटातून देण्यात आले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून शुभम विलास पाटील साने गुरुजी यास प्रथम, तर योगेश्वर प्रभाकर पाटील व आर्या पाटील सायरदेवी बोहरा स्कूल अमळनेर यास द्वितीय ,तनिष्का शालिग्राम पाटील एन.टी.हायस्कूल हिला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस ,तर तमन्ना पावरा यशवंत माध्यमिक आश्रम शाळा पिंपळे, राजवीर दिलीप पाटील सेंट मेरी हायस्कूल मंगरूळ यांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली
पल्लवी रामकृष्ण पाटील के. पी. सोनार माध्यमिक विद्यालय जैतपीर हिला प्रथम, अर्जुन रामजी गोसावी जि.प. प्राथमिक शाळा टाकरखेडा यास द्वितीय ,तर ऋत्विक जैन एन.टी.मुंदडा यास तृतीय, हितिका चोरडिया व पलक बाविस्कर बोहरा स्कूल अमळनेर यांना उत्तेजनार्थ , ललित उदयसिंग पाटील के. पी. सोनार माध्यमिक विद्यालय जैतपीर यास उत्तेजनार्थ बक्षीस प्राथमिक स्तरातून देण्यात आले.

माध्यमिक शिक्षक या गटातून बोहरा स्कूल मधील यशोदा सुधाकर शिंदे यांना प्रथम तर डॉ. भाग्यश्री रामदास वानखडे जय योगेश्वर महाविद्यालय अमळनेर यांना द्वितीय आकाश सुरेश पाटील माध्यमिक विद्यालय नगाव गडखांब यांना तृतीय क्रमांकाचे बक्षिसे देण्यात आले. सायरदेवी बोहरा स्कूल मधील सौ. भाग्यश्री श्रीकांत थोरात यांना प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्फिन मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन नेहा गुरव मॅडम यांनी केले होते.
हा उत्कृष्ट कार्यक्रम शाळेचे चेअरमन श्री सुरेंद्रकुमार बोहरा सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र सिंह सर यांच्या मार्गदर्शनाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहयोगाने यशस्वीरित्या पार पडला

विकसित भारत घडविण्यात विद्यार्थीच खरे शिल्पकार आहेत, हा संदेश देत ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *