ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा  ,अमळनेर तालुक्यात खरीप 2025 साठी ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध
1 min read

ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा ,अमळनेर तालुक्यात खरीप 2025 साठी ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध

Loading

 

ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा

अमळनेर तालुक्यात खरीप 2025 साठी ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक नोंद होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अशा शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पीक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांच्या शासन निर्णय क्र. लवेसु-2025/शिकना/प्र.क्र.3/भूमापन, दिनांक 14 डिसेंबर 2025 अन्वये, ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने पीक पाहणी नोंद करणे शक्य झालेले नाही, त्यांच्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यानुसार अमळनेर तालुक्यातील सर्व संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे ऑफलाईन पीक पाहणीसाठी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायत कार्यालयात तात्काळ जमा करावेत. प्राप्त अर्जांच्या आधारे अधिकृत यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

ऑफलाईन पीक पाहणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचा कालावधी :
17 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025

ग्रामस्तरीय समितीकडून स्थळ पाहणी :
25 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026

स्थळ पाहणी अहवाल उपविभागीय स्तरीय समितीकडे सादर :
8 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026

उपविभागीय समितीकडून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर :
13 जानेवारी 2026 ते 15 जानेवारी 2026

ऑफलाईन पीक पाहणी नोंद झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, अनुदान, नुकसान भरपाई व इतर लाभ मिळण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही संधी न दवडता दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अमळनेरचे तहसीलदार श्री. रुपेश कुमार सुराणा यांनी पत्राद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *