अमळनेरचा ओम पाटील इस्रो सहलीसाठी निवडला ; शालेय वयातच अंतराळ विज्ञानाकडे झेप
1 min read

अमळनेरचा ओम पाटील इस्रो सहलीसाठी निवडला ; शालेय वयातच अंतराळ विज्ञानाकडे झेप

Loading

.

अमळनेरचा ओम पाटील इस्रो सहलीसाठी निवडला ; शालेय वयातच अंतराळ विज्ञानाकडे झेप

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील बोहरा सेंट्रल स्कूलमधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी ओम अनिल पाटील याची इस्रो (ISRO) सहलीसाठी निवड झाल्याने अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
नोबेल फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निवड परीक्षेत ओम पाटील याने उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेच्या माध्यमातून त्याची अहमदाबाद येथील इस्रो केंद्राला भेट देण्यासाठी आयोजित शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल जळगाव येथील कांताबाई सहभागृहात आयोजित पुरस्कार सोहळ्यात, सुप्रसिद्ध लेखक राजीव तांबे यांच्या शुभहस्ते ओम पाटील याचा सन्मान करण्यात आला. या यशासाठी त्याला नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ओम पाटील हा सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक तसेच दैनिक साईमतचे तालुका प्रतिनिधी अनिल नथ्थू पाटील व गायत्री पाटील यांचा सुपुत्र आहे.
ओमच्या या यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी, पालक, नातेवाईक व नागरिकांकडून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *