खानदेश शिक्षण मंडळ निवडणूक 2025 : उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण; एक अर्ज अवैध उमेदवारी छाननीनंतर खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीचे चित्र स्पष्ट
![]()
खानदेश शिक्षण मंडळ निवडणूक 2025 : उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण; एक अर्ज अवैध
उमेदवारी छाननीनंतर खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीचे चित्र स्पष्ट
अमळनेर प्रतिनिधी :
खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या त्रैवार्षिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आज दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 ते 4.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. सदर छाननी ESH EDUCAT येथे शांततेत व नियमानुसार पार पडली.
छाननी दरम्यान श्री. धनगर विठोबा आनंदा यांनी एकच उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. मात्र त्यांच्या अर्जामध्ये अनुमोदक श्री. पाटील ज्ञानेश्वर गंगाराम यांचा सभासद क्रमांक तसेच उमेदवाराचा आधार क्रमांक चुकीचा नोंदविण्यात आल्याने सदर अर्ज अवैध ठरविण्यात आला. उर्वरित सर्व उमेदवारी अर्ज नियमांनुसार असल्याने ते वैध घोषित करण्यात आले.
छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी एकूण दहा उमेदवार वैध ठरले असून त्यामध्ये विनोद जगदीश अग्रवाल, किसन देवराम पाटील, डॉ. रविंद्र काशिनाथ कुळकर्णी, विक्रम विपीनचंद शाह, विजय जगन्नाथ बोरसे, लालचंद हेमनदास सैनानी, राकेश गिरधरलाल माहेश्वरी, संतोष यायुराय पाटील, अक्षय नंदकिशोर अग्रवाल व अनिल मधुकर पाटील यांचा समावेश आहे.
उपाध्यक्ष पदासाठी सचिन बुधा पाटील, कमल आसकरण कोचर, माधुरी प्रमोद पाटील, नगिनचंद ग्यानचंद लोढा, सुभाष यशवंतराव पाटील, पुरुषोत्तम वसंत शेटे, संदिपकुमार केवलचंद जैन व मनिषा विवेकानंद लाठी हे उमेदवार वैध ठरले आहेत.
विश्वस्त पदासाठी वसुंधरा दशरथ लांडगे, नगिनचंद ग्यानचंद लोढा, सुभाष यशवंतराव पाटील, संतोष बाबुराव पाटील, पुरुषोत्तम वसंत शेटे व संदिपकुमार केवलचंद जैन यांचे अर्ज वैध ठरले.
तसेच कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी एकूण २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले असून त्यामध्ये निशांत राजेंद्र अग्रवाल, योगेश मधुसुदन मुंदडे, पंकज गोविंद मुंदडे, कल्याण साहेबराव पाटील, कमल आसकरण कोचर, हरी भिका वाणी, जितेंद्र मोहनलाल जैन, डॉ. अनिल नथ्थु शिंदे, प्रदीप कुंदनलाल अग्रवाल, निरज दिपचंद अग्रवाल, डॉ. संदेश बिपीन गुजराथी, प्रसाद रमेशचंद शर्मा, प्रविण रामलाल जैन, विक्रम विपीनचंद शहा, लिना प्रविण पाटील, संतोष बाबुराव पाटील, डॉ. रविंद्र काशिनाथ कुळकर्णी, दिलीप हरकचंद जैन, डॉ. अविनाश रघुराज जोशी, कल्याणराव वसंतराव पाटील, मनिषा विवेकानंद लाठी व जितेंद्र शांतीलाल झाबक यांचा समावेश आहे.
दरम्यान, उमेदवारी माघारीचे अर्ज संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध असून ते दि. 17 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत दुपारी 11.00 ते 3.00 या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी माघारीसाठी उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे कळविण्यात आले आहे.
सदर उमेदवारी छाननी प्रक्रिया निवडणूक उप-समितीचे अध्यक्ष श्री. पंडित रामचंद्र चौधरी, सदस्य विवेकानंद लक्ष्मण भांडारकर, मनोहर भगवान महाजन, प्रा. डॉ. सुनिल लिंबाजी गरूड यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस प्रा. पराग पी. पाटील, तसेच राकेश निळे व भटू चौधरी यांनी सहकार्य

