मंगरूळमध्ये विज्ञानाची मेजवानी!  ५३ वे अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उदया सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये भव्य आयोजन
1 min read

मंगरूळमध्ये विज्ञानाची मेजवानी! ५३ वे अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उदया सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये भव्य आयोजन

Loading

मंगरूळमध्ये विज्ञानाची मेजवानी!

५३ वे अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उदया सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये भव्य आयोजन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १६ रोजी सकाळी १० वाजता मंगरूळ येथे सायरादेवी बोहरा स्कूल मध्ये आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष सुरेंद्रकुमार बोहरा तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ ,शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण , डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे , जिल्हा विज्ञान समन्वयक डॉ चंद्रकांत साळुंखे ,उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण , उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी , नरेंद्र चौधरी ,फिरोज पठाण ,एजाज शेख , प्रतिभा सानप , विजय सरोदे , माजी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील , गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील ,विस्तार अधिकारी कविता सुर्वे , गटसमन्वयक रवींद्र पाटील हजर राहणार आहेत.
सकाळी ८ वाजेपासून साहित्य मांडणी करण्यात येणार आहे. तर बक्षीस वितरण साठी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , गटविकास अधिकारी एन आर पाटील , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , मुख्याधिकारी गणेश शिंदे उपस्थित राहणार आहेत.
सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन बघण्यास आणावे असे आवाहन पंचायत समिती , गटसाधन केंद्र ,अमळनेर तालुका विज्ञान मंडळ ,अमळनेर तालुका गणित मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *