मुलांच्या चुका दाखवण्यापेक्षा बरोबर काय ते सांगा.- राजीव तांबे नोबेल फाउंडेशन व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन आयोजित नोबेल व्याख्यानमालेत प्रतिपादन
![]()
मुलांच्या चुका दाखवण्यापेक्षा बरोबर काय ते सांगा.- राजीव तांबे
नोबेल फाउंडेशन व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन आयोजित नोबेल व्याख्यानमालेत प्रतिपादन
जळगांव प्रतिनिधी- “मुलांच्या चुका दाखवण्यापेक्षा ते काय बरोबर करतात ते सांगा म्हणजे जेणेकरून मुलांमध्ये सकारात्मक वृत्ती वाढीस लागेल.” असे प्रतिपादन शिक्षण तज्ञ साहित्यिक राजीव तांबे यांनी केले पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित नोबेल व्याख्यानमाला प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर डायटचे निवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड, बच्छाव मोटर्सचे किरण बच्छाव, विद्यार्थी सहाय्यक समितीचे एस एस राणे, राज्यकर अधिकारी राहुल पाटील,ग्लोबल मिशन इंग्लिश स्कूलचे मनोहर पाटील ,जीनियस इंटरनॅशनल स्कूलचे नितीन पाटील, जैन इरिगेशनचे अनिल जोशी यावेळी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी नोबेल फाउंडेशन तर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय विज्ञान पुरस्कारांची वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अमळनेर येथील मिलके चलो असोसिएशन ,जळगाव येथील युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया ,नंदुरबार येथील समुदकर्षक क्लासेस या संस्थांना राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर विवेकानंद प्रतिष्ठानचे विज्ञान शिक्षक उमेश इंगळे यांना डॉ.सी. व्ही. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार तर हिंगणघाट येथील यथार्थ कौस्तुभ जनईकर यास एपीजे अब्दुल कलाम बालवैज्ञानिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच नोबेल फाउंडेशन व भवरलाल अंड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून इसरो दौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थी व पालकांचाही सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना श्री राजीव तांबे म्हणाले की, मुलांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे असते .मुलांच्या भावनांशी सहमत असायला पाहिजे. मुलांच्या सर्वच विचारांशी सहमत असू नये .मुलांसमोर कोणत्याही चांगल्या वागणुकीचा देखावा करू नका. चांगली वागणूक ही सर्वांसमोर नेहमीची असली पाहिजे ती प्रसंगानुसार नसावी लहान मुलं ही चुका करतीलच चूक करणे म्हणजे दुसऱ्या पद्धतीने विचार करणे असे होते. आपल्या मुलांनी जसे वागावे असे आपल्याला अपेक्षित असते आधी आई-वडिलांनी तसे नियमित वागावे म्हणजे मुले आपोआप तशीच वागायला लागतात.
याप्रसंगी निळकंठ गायकवाड ,किरण बच्छाव, एस एस राणे यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीश पाटील यथार्थ जनाईकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपले विचार मांडले. याप्रसंगी पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल पत्रकार डॉ. दिलीप तिवारी तसेच आय एम आर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. दिपाली पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सहाय्यक अभियंता पदी निवड झालेल्या हर्षल जितेंद्र पाटील आणि मागील वर्षी एमएचटी-सीईटी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण खिलेश पांडुरंग पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या संमेक इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल नीता पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सिद्धी थोरात रोशनी पाटील, संस्कृती मनूचारी ,दुरीता महाजन, यांनी सूत्रसंचालन केले. सायली पाटील पूजा पाटील मानसी पाटील प्राजक्ता सावंत यांनी गुरुवंदना सादर केली विवेक साळुंखे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील अक्षय देवरे जय वीर पाटील आदींनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांसह श्री राजीव तांबे विक्रीकर अधिकारी राहुल पाटील मनोहर पाटील आदी मान्यवर
फोटो कॅप्शन 2 नोबेल व्याख्यान माला प्रसंगी राजीव तांबे यांचा सन्मान करताना निळकंठ गायकवाड किरण बच्छाव अनिल जोशी मनोहर पाटील एस एस राणे राहुल पाटील व मान्यवर


