अमळनेरचा अभिमान! दिनेश बागडे यांचे परा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णयश, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड”
1 min read

अमळनेरचा अभिमान! दिनेश बागडे यांचे परा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णयश, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड”

Loading

अमळनेरचा अभिमान! दिनेश बागडे यांचे परा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णयश, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
पुणे, हिंजवडी येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या राज्यस्तरीय Para Powerlifting स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडे यांनी जबरदस्त कामगिरी करत 105 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्यांच्या या दमदार यशामुळे अमळनेर शहरासह जळगाव जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रात मान वाढला आहे.
दिनेश बागडे यांनी शक्ती, जिद्द आणि कठोर प्रशिक्षणाच्या जोरावर राज्य पातळीवरील सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्यांच्या कामगिरीची दखल घेत 16 ते 18 जानेवारी 2026 रोजी उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय Para Powerlifting स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेतही ते उत्कृष्ट कामगिरी करतील, अशी क्रीडा क्षेत्रात उत्सुकता आहे.
यापूर्वीही दिनेश यांचे पराक्रम उल्लेखनीय आहेत. 2025 मधील Khelo India Para Powerlifting स्पर्धेत त्यांनी Gold Medal मिळवून राज्यभरात आपली छाप उमटवली होती, तर 2024 मध्ये त्यांनी Bronze Medal जिंकत सातत्याने प्रगतीची दालनं खुली केली.
अमळनेर नगर, क्रीडा प्रेमी, आणि समर्थकांच्या वतीने दिनेश बागडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन
समस्त कंजरभाट समाज अमळनेर यांनी
केले आहे. राष्ट्रीय स्पर्धेतही ते सुवर्णपदकाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *