फार्मसी महाविद्यालयात श्रीमंत प्रताप शेटजी यांची १४६ वी जयंती साजरी*
![]()
*फार्मसी महाविद्यालयात श्रीमंत प्रताप शेटजी यांची १४६ वी जयंती साजरी*
अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी व प्रा. र. का केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात दानशूर व्यक्तिमत्व, शिक्षण, उद्योग, सेवा व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणारे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४६ वी जयंती साजरी करण्यात आली. श्रीमंत प्रतापशेटजी यांच्या उद्योग, शिक्षण, अध्यात्म व वैद्यकीय सेवा क्षेत्रातील योगदानाची माहिती संपूर्ण फार्मासी महाविद्यालयात ज्ञात आहे. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर वृन्द व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान खा.शि. मंडळाचे फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन योगेशजी मुंदडे व प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी अमळनेर नगरीचे भाग्यविधाते समाजसुधारक शिक्षणप्रेमी कर्मयोगी श्रीमंत प्रतापशेठजी यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.

